Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mediclaim : विम्याचा दावा करण्यासाठी रुग्णालयात 24 तास ॲडमिट असणे गरजेचे आहे का?

Mediclaim :  विम्याचा दावा करण्यासाठी रुग्णालयात 24 तास ॲडमिट असणे गरजेचे आहे का?

आरोग्य विमा कंपनीकडून स्वीकारल्या जाणार्‍या दाव्यांसाठी संबंधित योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. एक मानक निकष असा आहे की कोणतेही दावे दाखल करण्यासाठी विमाधारक हा किमान 24 तास रुग्णालयात अॅडमिट असला पाहिजे. मात्र ज्या वैद्यकीय उपचारांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते आणि 24 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येतात, त्यावेळी हे 24 तासाचा निकष आवश्यक नसतो, त्यांना डे-केअर प्रक्रिया म्हणून

आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विमाधारक रुग्णालयात दाखल होतो. कधी कधी रुग्णास 24 तासांपेक्षा कमी वेळेत उपचार करून रुग्णालयातून घरी सोडले जाते. मात्र, अशा परिस्थितीत विमा कंपनी तुमचा दावा मान्य करते का? की विमा कंपन्याच्या नियमांनुसार रुग्णाला 24 तास भरती व्हावे लागते याबाबत बऱ्याचवेळा आपला गोंधळ उडतो. आज आपण अशा प्रकारच्या प्रकरणात आपण विम्यासाठी दावा करू शकतो का? याबाबतची माहिती घेऊया..

अनेकदा वैद्यकीय विमा योजनांबाबत गृहीत धरले जाते की एका दिवसापेक्षा जास्त रुग्णालयात दाखल करणे ही एक अट आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीमुळे, सर्व उपचारांसाठी दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नाही. अनेक उपचार रुग्णालयात दाखल केल्याशिवाय आणि कधीकधी एका दिवसापेक्षा कमी वेळेत केले जातात. त्यामुळे आरोग्य विम्याच्या संदर्भात हॉस्पिटलायझेशन संदर्भात तुम्हाला खालील गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

डे-केअर प्रक्रिया  Day Care treatments   

आरोग्य विमा कंपनीकडून स्वीकारल्या जाणार्‍या दाव्यांसाठी संबंधित योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. एक मानक निकष असा आहे की कोणतेही दावे दाखल करण्यासाठी विमाधारकाने किमान 24 तास रुग्णालयात दाखल असले पाहिजे. मात्र, ज्या वैद्यकीय उपचारांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते आणि 24 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येतात, त्यासाठीचे निकष वेगळे असतात. त्यांना डे-केअर उपचार प्रक्रिया  (Day Care treatments) म्हणून ओळखले जाते. 

तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांमुळे आता पूर्वीच्या तुलनेत कमी कालावधीत अनेक आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे. सहसा, डे-केअर प्रक्रियेसाठी लागणारा वेळ 24 तासांपेक्षा कमी म्हणजे 2 ते 3 तासांचा असतो. प्रक्रियांना कमी वेळ लागत असला तरीही, उपचारांचा खर्च जास्त आहे आणि त्यामुळे तुमच्या विमा पॉलिसीमध्ये कव्हर करणे आवश्यक आहे.

निवडक उपचारासाठी 24 तासांची अट नाही

पॉलिसीधारकांना मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसलेल्या किरकोळ उपचारांसाठी खर्च मिळवून देण्यासाठी, विमा कंपन्यांनी योजनेचा भाग म्हणून डे-केअर प्रक्रियेसाठी कव्हरेज सुरू केले आहे. डे-केअर उपचार हे असे वैद्यकीय उपचार आहेत जे स्थानिक/सामान्य भूल अंतर्गत केले जातात आणि सहसा 24 तासांच्या आत पूर्ण केले जातात. मोतीबिंदू, रेडिओथेरपी, केमोथेरपी, डायलिसिस, अँजिओप्लास्टी, अॅपेन्डेक्टॉमी, यकृत आकांक्षा, कोलोनोस्कोपी, ईएनटी आणि दंत आजार इ. अशा प्रक्रियांची काही उदाहरणे आहेत. अशा उपचार पद्धतीमध्ये विमा कंपन्या डे-केअर प्रक्रियेसाठीचे दावे दाखल करण्याची परवानगी देतात. 

सर्वसमावेशक विमा निवडा-

वैद्यकीय विमा खरेदी करताना, विशेषत: तुमच्या पालकांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी, वयानुसार, वैद्यकीय उपचारांवरील अवलंबित्व वाढते म्हणून डे केअर सुविधा तुमच्या विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट आहेत का हे तपासणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात उपचाराचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये काही रुग्णालयात न जाता वैद्यकीय उपचार घेता येतात. यासाठी तुमच्याकडे सर्वसमावेशक सुविधांचा विमा असणे गरजेचे आहे. म्हणजेच प्रत्येकाकडे सर्वोत्तम आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. वैद्यकीय विमा हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून, तुम्ही त्या संदर्भातील अधिक माहिती घ्या आणि सर्वोत्तम वैद्यकीय विमा खरेदी करण्यास प्राधान्य द्या.