कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीला प्रचंड फायदा झाला आहे. मायक्रोसॉफ्टचा शेअर अमेरिकेन शेअर बाजारात रेकॉर्ड पातळीवर गेला. यामुळे मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे बाजार भांडवल 2.59 ट्रिलियन डॉलर्स इतके वाढले आहे.
कॉम्प्युटर सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट ही आघाडीची कंपनी आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मायक्रोसॉफ्टचे वर्चस्व आहे. कंपनीने विकसित केलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे नजीकच्या काळात फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे शेअर मार्केटमध्ये मायक्रोसॉफ्ट कॉर्पचा शेअर प्रंचड वधारला. यामुळे मायक्रोसॉफ्टचे मार्केट कॅपिटलायझेशन 2.59 ट्रिलियन डॉलर्स इतके वाढले.
कंपनीने AI तंत्रज्ञाना मोठी गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय ओपन एआयमध्ये देखील मायक्रोसॉफ्ट प्रचंड गुंतवणूक करत आहे. चॅटबोट चॅटजीपीटी सेवा देणाऱ्या स्टार्टअप्सवर नुकताच मायक्रोसॉफ्टने ताबा मिळवला होता.
शेअर मार्केटमध्ये गुरुवारी मायक्रोसॉफ्ट कॉर्पचा शेअर 3.2% ने वधारला आणि तो 348.10 डॉलरवर गेला. चालू वर्षात मायक्रोसॉफ्ट कॉर्पचा शेअर 45% ने वधारला आहे. यापूर्वी 19 नोव्हेंबर 2021 मध्ये मायक्रोसॉफ्ट कॉर्पचा शेअर 343.11 डॉलरवर गेला होता. 22 नोव्हेंबर 2021 मध्ये मायक्रोसॉफ्ट कॉर्पचा शेअरने 349.67 डॉलरचा रेकॉर्ड स्तर गाठला होता.
अमेरिकन शेअर बाजारात केवळ मायक्रोसॉफ्ट कॉर्पचा शेअर तेजीत नाही. तर तंत्रज्ञान क्षेत्रातील अॅपलच्या शेअरला देखील गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. अॅपलचा शेअर गुरुवारी 186.01 डॉलरवर बंद झाला. एनव्हिडीयाचा शेअर इंट्रा डेमध्ये 432.89 डॉलरपर्यंत वाढला होता.
जगभरातील कंपन्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञान झपाट्याने वापरत आहे. यामुळे नजीकच्या काळात आर्टिफिशिअल तंत्रज्ञानाला मोठी मागणी असेल. यामुळे मायक्रोसॉफ्टला देखील कमाईची मोठी संधी आहे. इंडस्ट्रीमधील लिडर या नात्याने एआयमधून मायक्रोसॉफ्ट मोठी कमाई करेल, असे बोलले जाते. यावरुन जेपी मॉर्गन या संस्थेने मायक्रोसॉफ्टच्या शेअरबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे.