Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSSC Scheme: पंजाब नॅशनल बँकेत ओपन करता येईल 'महिला सन्मान बचत पत्र खाते', जाणून घ्या योजनेबद्दलची सविस्तर माहिती

MSSC Scheme

MSSC Scheme: केंद्रीय अर्थसंकल्पात खास महिलांसाठी निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा केली. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा नंतर आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील महिला ग्राहकांना हे खाते ओपन करता येणार आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून महिला ग्राहक सर्वाधिक परतावा मिळवू शकतात.

आर्थिक वर्ष 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी खास महिलांसाठी 'महिला सन्मान बचत पत्र' योजनेची घोषणा केली. महिलांनी जास्तीत जास्त आर्थिक गुंतवणूक करावी, या हेतूने या योजनेची सुरुवात करण्यात आली.

या योजनेची सुरुवात पोस्ट ऑफिस पासून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर कॅनरा बँक (Canara Bank), बँक ऑफ इंडिया (Bank of India) आणि बँक ऑफ बडोदानंतर (Bank of Baroda) आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये (Punjab National Bank) देखील महिला ग्राहकांना 'महिला सन्मान बचत पत्र खाते' (MSSC Scheme) ओपन करता येणार आहे, अशी घोषणा बँकेकडून करण्यात आली आहे. यानिमित्ताने या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गुंतवणूक कोण आणि कितपत करू शकते?

केंद्राकडून चालवण्यात येणाऱ्या महिला सन्मान बचत पत्र योजनेमध्ये वैयक्तिक महिला MSSC खाते सुरू करू शकतात. तर अल्पवयीन मुलींच्या नावाने पालक बँकेमध्ये खाते ओपन करू शकतात. या खात्यामध्ये कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवता येतात.

MSSC खात्यावर व्याजदर किती मिळतो?

महिला सन्मान बचत पत्र (MSSC) खात्यावर 7.5% वार्षिक व्याजदर मिळतो. प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ पद्धतीने व्याज गुंतवणुकदाराच्या खात्यात जमा केले जाते. या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा करपात्र आहे.

MSSC खाते किती कालावधीसाठी सुरू करता येते?

महिला सन्मान बचत पत्र खाते सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी परिपक्व होते. 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेंतर्गत खाते सुरू करता येईल.

मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद करता येते का?

खातेधारकाचा मृत्यू, गंभीर आजाराने झाल्यास खाते वेळेआधी बंद करता येईल. खाते सुरू केल्यानंतर 6 महिन्यांच्या आत खाते बंद करत असाल, तर व्याजदरापैकी 2% दंड भरावा लागेल. त्यामुळे 5.5% व्याजदराने पैसे मिळतील. महिला सन्मान बचत पत्र (MSSC) खाते सुरू केल्यानंतर 1 वर्षानंतर गुंतवणुकदार 40% पर्यंत रक्कम काढू शकतो.

Source: hindi.moneycontrol.com