Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MF Investment in May: रेल्वे सेक्टरमधील 'हा' शेअर ठरतोय म्युच्युअल फंडांची पहिली पसंत, मे महिन्यात मोठी गुंतवणूक

Jupiter Wagon

Image Source : www.appreciatewealth.com

MF Investment in May: म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीमुळे सध्या ज्युपिटर वॅगनचे व्हॅल्यूएशन आकर्षक बनले आहे. ईपीएसच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 साठी ज्युपिटर वॅगनचे व्हॅल्यूएशन 17.4 पट इतके आहे.

गेल्या महिन्यात रेल्वे सेक्टरमधील ज्युपिटर वॅगन हा स्टॉक अचानक चर्चेत आला आहे. ज्युपिटर वॅगन या शेअरने मे महिन्यात सर्वाधिक ट्रेड झालेल्या स्टॉक्सच्या यादीत स्थान मिळवले होते. ज्युपिटर वॅगनमध्ये काही निवडक म्युच्युअल फंडांनी केलेली गुंतवणूक या शेअरच्या तेजीचे मुख्य कारण ठरल्याचे बोलले जाते.

आयसीआयसीआय डायरेक्ट या ब्रोकर्स संस्थेच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात ज्युपिटर वॅगनमध्ये म्युच्यअल फंडांनी एकूण 62 कोटींची गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडांच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे ज्युपिटर वॅगनचा शेअर मे महिन्यात तेजीत होता.

jupiter.jpg
Source : Rediffmoney.com

ज्युपिटर वॅगन या शेअरमध्ये मे महिन्यात टाटा रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड, टाटा बिझनेस सायकल फंड, आयटीआय फ्लेक्सी कॅप फंड, आयटीआय मिडकॅप फंड, आयटीआय मल्टीकॅप फंड या म्युच्युअल फंडांनी वेगवेगळ्या योजनांसाठी ज्युपिटर वॅगनच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.

या गुंतवणुकीमुळे सध्या ज्युपिटर वॅगनचे व्हॅल्यूएशन अट्रॅक्टीव्ह बनले आहे. ईपीएसच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 साठी ज्युपिटर वॅगनचे व्हॅल्यूएशन 17.4 पट इतके आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये ईपीएसच्या तुलनेत ते 12.8 पट इतके आहे.

शेअरमध्ये जबरदस्त तेजी

मागील महिनाभरात तेजीने ज्युपिटर वॅगनचा शेअर 25% ने वधारला आहे. तीन महिन्यात तो 50% ने वधारला असून एक ते तीन वर्षात हा शेअर 1000% ने वधारला आहे. शुक्रवारी 16 जून 2023 रोजी ज्युपिटर वॅगनचा शेअर 148.95 रुपयांवर बंद झाला. त्यात 1.95% वाढ झाली.

आर्थिक कामगिरीने शेअरला मिळाला बुस्टर

  • मूळची कोलकात्याची असलेली ज्युपिटर वॅगन ही कंपनी रेल्वेत मालवाहतुकीसाठी लागणारे वॅगन्स किंवा डबे बनवते. 
  • याशिवाय नाशवंत मरिन प्रॉडक्ट्ससाठी कंपीनकडून रेफ्रिजरेटेड कंटेनर देखील तयार केले जातात. 
  • भारतीय रेल्वे, खासगी मालवाहतूकदार कंपनीचे ग्राहक आहेत. 
  • ज्युपिटर वॅगनची उपकंपनी ज्युपिटर इलेक्ट्रिक ही कंपनी लवकरच इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात उतरणार आहे.
  • आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ज्युपिटर वॅगनच्या एकूण विक्रीत 96% वाढ झाली होती. 
  • कंपनीला विक्रीतून एकूण 711.70 कोटींचा महसूल मिळाला. 
  • कंपनीच्या नफ्यात 184% वाढ झाली असून कंपनीला 39.21 कोटींचा नफा मिळाला. 
  • ज्युपिटर वॅगनचा करपूर्वी नफा 189%  ने वाढला असून 93.23 कोटी मिळाले आहेत. 

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)