आपला व्यवसाय वाढवा यासाठी प्रत्येक व्यावसायिक मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे. मेटाने खास व्यावसायिकांसाठी बिझनेस व्हॉटसॅप सुरू केले. आता मेटाने मुंबईतील आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान आणखी एक फीचर लॉन्च केले आहे. मेटाने बुधवारी व्हॉट्सॲप चॅटद्वारे व्यवसाय वाढीसाठी फायदा होणाऱ्या WhatsApp Flows या नवीन फीचरचा समावेश केला आहे.
काय आहे व्हॉट्सॲप फ्लो?
मेटाने खास व्यावयासिकांसाठी नवीन फीचर लॉन्च केले आहे. व्हॉट्सॲप फ्लो हे एक प्रकारे ई कॉमर्स संकेतस्थळाप्रमाणे काम करेल. या माध्यमातून युजरला आपल्या व्यवसायाशी निगडीत व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. जसे की तुमचे किराणा दुकान असेल तर तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून लिस्ट चॅटच्या माध्यमातून प्राप्त करू शकता, आणि त्या वस्तूचे डिलिव्हरी स्टेटसचीही माहिती देऊ शकणार आहात. तसेच युजरला ऑनलाईन जेवण ऑर्डर करता येऊ शकते, रेल्वे विमानाची तिकीट बूक करता येतील, तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित भेटीची वेळ, ठिकाण निश्चित करता येणार आहे.
व्हॉट्सॲप चॅट वरून ऑनलाईन खरेदी
युजरला व्हॉटसॅपच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी विक्री देखील करता येणार आहे. यासाठी UPI अॅप्स, डेबिट कार्ड,क्रेडिट कार्डवरून युजर प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहे. ही सुविधा युजरला WhatsApp चॅटवरच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आठवड्यात युजर्ससाठी सुरू होणार सुविधा
मेटाने लॉन्च केलेले हे फ्लो फीचर येत्या आठवड्यात" WhatsApp बिझनेस प्लॅटफॉर्मवर युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. तसेच या फीचरच्या माध्यमातून जे व्यावसायिक उपलब्ध असतील ते मेटाकडून पडताळणी करण्यात आलेले असतील. व्हेरिफाईड व्यावसायिकांना मेटाकडून बॅज दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल. यासाठी व्यावसायिक युजरला त्याचे खाते Meta Verified करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. जेणे करून WhatsApp चॅटवरून व्यवसायाशी संबंधित सुविधांचा लाभ घेता येणार आहे.