मेसन वॉल्व्ह इंडिया लिमिटेड(Mason Valves India ltd) या कंपनीचा IPO 8 सप्टेंबरला ओपन झाला होता. त्यानंतर गुरुवारी ( 21 सप्टेंबर) हा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. या आयपीओने गुंतवणूकदारांना चांगलेच मालमाल केले आहे. या आयपीओ 102 रुपये प्रति शेअर इश्यू झाला होता. त्यानंतर तो शेअर बाजारात BSE (SME) वर 193.80 रुपयांवर लिस्ट झाला आहे. या आयपीओमध्ये गुतंवणूक करणाऱ्या भागधारकांना 90% चा भरघोस नफा मिळाला आहे.
लिस्टिंगनंतर शेअर तेजीत-
कंपनीचा आयपीओ लिस्ट झाल्यानंतर गुंतवणूकदारांना प्रंचड फायदा मिळाला.193.80 रुपयांवरती लिस्टींग झाल्यानंतरही शेअरच्या किमतीत तेजी दिसून आली. मार्केट बंद होईपर्यंत MVI चा शेअर 203.45 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजे गुंतवणूकदारांना जवळपास 99% पेक्षा जास्त नफा मिळाला. मार्केटच्या दुसऱ्या दिवशीही MVI च्या शेअरमध्ये 4.99% वाढ होत 213.16 रुपयांवर व्यवहार करत आहे.
31.09 कोटी रुपयांचे भांडवल
मेसन वाल्व्ह इंडियाचा आयपीओ सब्सक्रिप्शन 8 ते 12 सप्टेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 31.09 कोटी रुपयांचे भांडवल निर्माण करणार होती. या भांडवलातून कंपनी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभे करणे, त्यासाठी लागणारी मशनरी खरेदी आणि प्लांट चावण्यासाठी लागणारे भांडवल यासाठी वापर करणार आहे.कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उद्योगांना वॉल्व, अॅक्ट्युएटर, स्ट्रेनर्स आणि रिमोट-कंट्रोलचा पुरवठा करते.