Master Components IPO: मास्टर कॉम्पोनन्टंस लिमिटेड कंपनीने आपला आयपीओ मार्कटमध्ये आणला आहे. सोमवारपासून (दि. 18 सप्टेंबर) या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात झाली असून गुंतवणूकदारांना 21 सप्टेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
मास्टर कॉम्पोनन्टंस लिमिटेड कंपनीचा आयपीओ हा एक एसएमई आयपीओ (SME IPO) असून कंपनीने यातून 15.43 कोटी रुपये उभारण्याचा निश्चय केला. यासाठी कंपनीने 9.80 कोटींचे 7 लाख नवीन शेअर्स आणि ऑफर फॉर सेल (Offer for Sale-OFS) अंतर्गत 5.63 कोटींचे 4.02 लाख शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
Table of contents [Show]
SME IPO म्हणजे काय?
100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO म्हणतात. या कंपन्यांसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) आणि बीएसई (Bombay Stock Exchange-BSE)वर 2012 मध्ये दोन एक्सचेंज सुरू करण्यात आली आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर BSE SME आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर NSE EMERGE असे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर SME IPOचे लिस्टिंग होते.
प्रति शेअर किंमत 140 रुपये
कंपनीने आयपीओ अंतर्गत आणलेल्या प्रत्येकी एका शेअर्सची किंमत 140 रुपये निश्चित केली. या प्रत्येक शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. गुंतवणूकदारांना यामध्ये 21 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. 26 सप्टेंबरला शेअर्सचे वाटप तर 27 सप्टेंबरला ज्यांना लॉट लागला नाही. त्यांचे पैसे रिटर्न केले जातील. त्यानंतर 28 सप्टेंबरला ज्यांना लॉट लागला आहे. त्यांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा होतील.
एनएसईवर होणार शेअर्सचे लिस्टिंग
मास्टर कॉम्पोनन्टंस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 29 सप्टेंबरला एनएसईवर (National Stock Exchange-NSE) लिस्टिंग होतील. याच्या एका लॉटमध्ये 1 हजार शेअर्स असून त्यासाठी किमान 1 लाख 40 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. या आयपीओचे लीड मॅनेजर म्हणून आर्यमान फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी काम पाहत आहे. तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या आयपीओची रजिस्ट्रार आहे.
मास्टर कॉम्पोनन्टंस कंपनीबाबत
मास्टर कॉम्पोनन्टंस ही मास्टर ग्रुपमधील कंपनी असून, याची सुरूवात 1999 मध्ये झाली होती. ही कंपनी इलेक्ट्रिकल, मेडिकल, इंडस्ट्रिअल आणि ऑटो सेक्टरमधील मागणीनुसार मोल्डिंगचे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवून देते. या कंपनीचा कारखाना नाशिकमध्ये आहे.
मागील 3 वर्षात कंपनीला चांगला नफा झाल्याचे दिसून येते. 2021 मध्ये कंपनीला 76.14 कोटी रुपयांचा निव्वळ नफ झाला होता. तर 2022 मध्ये 93.73 आणि 2023 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत आणखी 1.71 कोटींची वाढ झाली.