युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच (UPI) द्वारे दरमहा लाखो कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. यादरम्यान अनेक वेळा युपीआय व्यवहारांशी संबंधित तांत्रिक समस्याही येत राहतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सप्टेंबर 2022 मध्ये युपीआयचे लाईट व्हर्जन – UPI Lite ही आवृत्ती सादर केली. यूपीआय लाइट स्टँडर्ड व्हर्जनच्या तुलनेत लहान व्यवहारांसाठी जलद कार्य करण्यास सक्षम आहे. सध्या पेटीएमने स्वतःच्या पेमेंट प्लॅटफॉर्मवर हे नवीन आणि लाईट व्हर्जन आणले आहे. जर तुम्ही दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या व्यवहारांसाठी PayTM चा युपीआय वापरत असाल, तर तुम्हाला पेटीएमच्या नवीन युपीआय लाईट (UPI Lite) बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ही नवीन आवृत्ती कशी वापरायची ते आज पाहूया.
याप्रमाणे पेटीएम यूपीआय लाईट सेट करा
- प्रथम पेटीएम अॅप उघडा.
- त्यानंतर तुम्ही स्क्रीनवर दिसणार्या “UPI Lite Set Up Now” या पर्यायावर क्लिक करावे.
- आता तुम्हाला UPI Lite शी जे बँक खाते कनेक्ट करायचे आहे ते निवडा. त्यानंतर युपीआय लाईट सेट करण्यासाठी proceed पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला UPI Lite मध्ये पैसे जोडण्यास सांगताना यामध्ये तुम्ही 1 ते 2000 रुपयांपर्यंत कोणतीही रक्कम जोडू शकता.
- ही पायरी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही कोणतेही पेमेंट करण्यासाठी पेटीएम युपीआय लाईट वापरणे सुरू करू शकता.
पेटीएम युपीआय लाईटद्वारे असे पेमेंट करा
- तुम्हाला ज्यांचे पैसे भरायचे आहेत त्यांच्याकडून QR कोड घ्या आणि तो स्कॅन करा किंवा ज्या संपर्क क्रमांकावर तुम्हाला पेमेंट करायचे आहे तो नंबर निवडा.
- यानंतर रक्कम जोडा.
- त्यानंतर स्क्रीनवर शेवटी दिसणार्या “Pay Securely” पर्यायावर क्लिक करा.
- तुम्ही हे करताच, तुमच्या UPI Lite मध्ये असलेल्या रकमेतील काही रक्कम संबंधित QR कोड किंवा संपर्क क्रमांकावरून खात्यात ट्रान्सफर केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत तुमच्याकडून कोणत्याही युपीआय पिनची विचारणा होणार नाही.
पहिल्यांदाच अँक्टिव्हेट करणाऱ्या युजरला मिळणार कॅशबॅक
सध्या, पेटीएम कॅनरा बँक (Canara Bank), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India), एचडीएफसी बँक (HDFC Bank), इंडियन बँक (Indian Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेसह युपाआय लाइटला सपोर्ट करत आहे. जारी केलेल्या पोस्टरनुसार, जे वापरकर्ते पहिल्यांदा पेटीएम यूपीआय लाईट अँक्टिव्ह करत आहेत. त्यांनी UPI Lite द्वारे रु. 1,000 जोडल्यास, त्यांना त्वरित बक्षीस म्हणून रु. 100 पर्यंत कॅशबॅक मिळेल.
News Source : Paytm UPI Lite से पेमेंट करना हुआ और भी आसान, नए फीचर का ट्रांजेक्शन के लिए ऐसे करें इस्तेमाल | The Financial Express