Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LPG Insurance Policy: गॅस सिलेंडरसोबत मिळतो 50 लाखांचा इन्शुरन्स; जाणून घ्या क्लेम प्रोसेस

LPG Insurance Policy

LPG Insurance Policy: तुम्ही जर नव्याने गॅस सिलेंडर घेणार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. गॅस सिलेंडरचे कनेक्शन घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाला आणि त्याच्या कुटुंबाला 50 लाखांचा इन्शुरन्स लागू होतो. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

LPG Insurance Policy: भारतातील कोणत्याही अधिकृत गॅस एजन्सीधारकाकडून गॅस सिलेंडर घेतल्यावर त्या ग्राहकाला आणि त्याच्या कुटुंबाला वेगवेगळ्या तरतुदीअंतर्गत 50 लाख रुपयांचा इन्शुरन्स लागू होतो.

तुम्ही जर नव्याने गॅस सिलेंडर घेणार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. गॅस सिलेंडरचे कनेक्शन घेतल्यानंतर गॅस उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांच्यावतीने ग्राहकंना काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातील महत्त्वाची सुविधा म्हणजे गॅस सिलेंडरचे कनेक्शन घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाला आणि त्याच्या कुटुंबाला 50 लाखांचा इन्शुरन्स लागू होतो. या पॉलिसीला एलपीजी इन्शुरन्स कव्हर (LPG Insurance Cover) असे म्हटले जाते. या पॉलिसीमध्ये गॅस सिलेंडरमुळे एखादी दुर्घटना झाल्यास त्याची नुकसाई भरपाई या पॉलिसीमधून ग्राहकाला मिळू शकते. पण यासाठी ग्राहकाला काही नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

एलपीजी इन्शुरन्स कव्हर

ग्राहक जेव्हा नव्याने गॅस सिलेंडरचे कनेक्शन घेतात. तेव्हा त्या कनेक्शनसोबत ग्राहकांना गॅस कंपन्यांकडून पुरवला जाणारा इन्शुन्स लागू होतो. या इन्शुरन्ससाठी ग्राहकांना कोणताही प्रीमिअम भरावा लागत नाही. या इन्शुरन्समध्ये गॅसच्या स्फोटामुळे एखाद्याचा अपघात झाल्यास त्याला अपघात विम्यांतर्गत 40 लाख रुपये मिळतात आणि गॅसच्या स्फोटामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये मिळतात.

एलपीजी इन्शुरन्सचा लाभ कसा घ्यायचा

गॅसच्या स्फोटामुळे झालेल्या अपघातात घराचे नुकसान झाले किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला अपंगत्व आल्यास, त्या कुटुंबातील सदस्यांनी या घटनेची नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी. दाखल केलेल्या तक्रारीच्या एफआयआरची (FIR) प्रत आणि इतर संबंधित गोष्टी जसे की, स्फोट झाल्यानंतरचे घराचे फोटो, गॅस कनेक्शनची कागदपत्रे, अपघातामुळे खर्च झाल्यास त्याची बिले आणि यामध्ये कोणाच मृत्यू झाल्यास त्याचे मृत्यू प्रमाणपत्र आणि दावा अर्ज अशी सर्व कागदपत्रे अपघातानंतर 30 दिवसांच्या आत गॅस एजन्सीद्वारे कंपनीकडे जमा करावीत.

विम्याची रक्कम कोणाला मिळते?

अपघातानंतर दावा केलेली इन्शुरन्सची रक्कम ज्याच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, त्यालाच मिळते. त्याच व्यक्तीच्या नावाने कंपनीकडे अर्ज करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत कोणीही वारसदार नसतो. पण इन्शुरन्सचा हा लाभ मिळण्यासाठी ग्राहकांनी सिलेंडर पाईप, गॅस स्टोव्ह बर्नर, रेग्युलेटर याची एक्सपायरी डेट चेक करणे गरजेचे आहे. तसेच कंपनीच्या मेकॅनिककडून वेळोवेळी या उपकरणांची तपासणी करणे आवश्यक आहे. मेकॅनिकने सूचना देऊनही ग्राहकांनी काही उपकरणे दुरूस्त किंवा बदलून घेतली नाही. तर कंपनी अशा ग्राहकांचा दावा फेटाळू शकते. यासाठी ग्राहकांना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

इन्शुरन्स अंतर्गत काय सुविधा मिळतात

गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे घराचे नुकसान झाल्यास किंवा यामुळे झालेल्या अपघाताची नुकसान भरपाई कंपनीकडून दिली जाते. प्रत्येक ग्राहकाला एकूण 50 लाखांचा इन्शुरन्स कव्हर मिळतो. त्याची विभागणी केल्यास प्रत्येक व्यक्तीला 10 लाखांचा कव्हर मिळतो. अपघात विम्यांतर्गत (Accident Insurance) प्रत्येक व्यक्तीला 5 लाखांचा कव्हरेज मिळतो. गॅसमुळे झालेल्या स्फोटात एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृत पावलेल्या व्यक्तीच्या नावाने 5 लाखांची भरपाई मिळते.

आपल्याकडे इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलिअम कंपनी, भारत पेट्रोलिअम कंपनी, शेल आदी कंपन्या गॅस सिलेंडर वितरित करतात. या कंपन्यांकडून ग्राहकांना विमा पुरवला जातो.