स्टॉक एक्सचेंज बीएसई आणि एनएसईने सोमवारी अदानी समूहाच्या तीन कंपन्यांसाठी सर्किट मर्यादा सुधारित केली आहे. अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांच्या लोअर सर्किटच्या लिमिटमध्ये ही सुधारणा केली आहे. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली. हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होऊ लागली.
गेल्या दोन सत्रांमध्ये अदानी ग्रीनचे बाजार भांडवल 1.6 ट्रिलियन रुपये तर अदानी टोटल गॅस चे मार्केट कॅप 1.45 ट्रिलियन रुपयांनी कमी झाले. अदानी ट्रान्स मिशनचे मार्केट कॅपही जवळपास र1 ट्रिलियन रुपयांनी घसरलेले बघायला मिळाले आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. अनेकदा असे दिसून येते की एखाद्या दिवशी बाजार वेगाने वर गेला की काही शेअर्सची खरेदी थांबवली जाते. ही परिस्थिती फास्ट डाउन स्टॉकमध्ये देखील होते. आपण अनेकदा शेअर बाजारातील तज्ञांकडून ऐकले आहे की आज या शेअरला सर्किट लागले आहे. हे सर्किट्स काय आहेत आणि शेअर मार्केटमध्ये त्याचे महत्त्व काय आहे , हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
शेअरच्या किमतीत अचानक होणाऱ्या हालचालींपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी एक्सचेंजेस मागील दिवसाच्या शेअरच्या किमतींवर आधारित शेअरच्या किमतीवर एक बँड लादतात. हा बँड मागील दिवसाच्या किमतीवर आधारित असतो. हे त्या बँडच्या मिडल लेवलला शेअरची किंमत ठेवते. या बँडला सर्किट म्हणतात. हे सर्किट अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट अशा दोन प्रकारचे असतात.
अप्पर आणि लोअर सर्किट
अप्पर सर्किट ही त्या दिवशीच्या स्टॉकची कमाल किंमत असते, तर लोअर सर्किट ही त्या स्टॉकची किमान किंमत असते. समजा काल एका कंपनीचे शेअर्स रु. 200 च्या भावाने बंद झाले आणि त्यावर रु. 25 चे सर्किट आहे. त्यामुळे ते शेअर्स दुसऱ्या दिवशी रु.225 पेक्षा जास्त आणि रु.175 पेक्षा कमी असू शकत नाहीत. या प्रकरणात 225 रुपये अप्पर सर्किट आणि 175 रुपये लोअर सर्किट होते.
गुंतवणूकदारांसाठी एक्सचेंजद्वारे सर्किट सुविधा प्रदान केली जाते. यामुळे गुंतवणूकदार एका दिवसात अचानक होणारे चढ-उतार टाळू शकतात. जेव्हा जेव्हा एखादा स्टॉक सर्किटला लागतो तेव्हा त्या दिवसासाठी त्याचे व्यवहार थांबवले जातात. मग ते शेअर्स कोणी विकत घेऊ शकत नाही किंवा विकू शकत नाही.सर्किट फिल्टर्सद्वारे, स्टॉक एक्स्चेंज स्टॉकमधील दैनंदिन चढउतार मर्यादित ठेवतात ज्यामुळे अनावश्यकपणे घसरण किंवा किमती वाढतात. एकदा सर्कीट मर्यादा एकतर वरच्या बाजूने किंवा डाउनसाइडवर पोहोचली की, स्टॉकची किंमत त्या दिशेने पुढे जाऊ शकत नाही.