अलीकडच्या काळात वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी बँकेत भरपूर प्रमाणात कागदपत्रे जमा करावी लागतात. यात ओळख व पत्त्याचा पुरावा गरजेचा असतो. पण आता हे कर्ज घेणे सोपे झाले आहे. तुम्ही आधार कार्डद्वारे ई-केवायसी करून जवळपास 2 लाखापर्यंतचे कर्ज अगदी 5 मिनिटांत मिळवू शकता. यासाठी इतर कोणतेही ओळखपत्र जमा करणे आवश्यक नसते. या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ.
कर्जासाठी बँकेची अट
आधार कार्डाच्या मदतीने वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणे अतिशय सोपे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँक यासारख्या बॅंकांमधून ग्राहक आधार कार्डद्वारे कर्ज घेऊ शकतात. परंतु हे कर्ज मिळवण्यासाठी ग्राहकाला सर्वप्रथम स्वत:चा क्रेडिट स्कोर तपासावा लागेल. कारण यासाठीचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. या माहितीच्याआधारे ग्राहकांना आधारकार्डद्वारे दोन लाखापर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते. या अर्जाच्या मंजुरीसाठी कमी वेळ लागतो आणि काही वेळातच ते कर्ज तुमच्या खात्यात जमा होते.
आधार कार्ड द्वारे कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- आधार कार्डचा वापर करून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला प्रथम भेट द्या.
- तुम्ही अधिकृत बँकेच्या मोबाईल अॅपचा वापर करून वैयक्तिक कर्जासाठी देखील अर्ज करू शकता.
- नाव व खात्याची नोंदणी केल्यानंतर एक ओटीपी मिळेल तो यात व्हेरिफाय करावा लागेल.
- यानंतर वैयक्तिक कर्ज या पर्यायाची निवड करावी लागेल.
- पुढे पॅनकार्डवरील तपशील भरून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- बँकेकडून सर्व माहिती तपासून कर्ज मंजूर केले जाते. त्यानंतर ते ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होते.
Source: www.graminmedia.com