• 02 Oct, 2022 09:14

LIC ने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली; शेअर 668 रूपयांच्या नीचांकावर

lic shares

LIC Share Price Update : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी (दि. 10 जून) 709 रूपयांवर बंद झालेला शेअर आज दिवसभर 5.84 टक्क्यांनी कोसळून 668.25 वर आला असून आतापर्यंतचा नीचांकी स्तर गाठला आहे.

LIC Share Price : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी (दि. 10 जून) 709 रूपयांवर बंद झालेला शेअर आज दिवसभर 5.84 टक्क्यांनी कोसळून 668.25 वर आला असून आतापर्यंतचा नीचांकी स्तर गाठला आहे. एलआयसीच्या या घसरणीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे बरेच नुकसान झाले आहे.

एलआयसीच्या शेअर्समध्ये आज झालेली घसरण (LIC Share Fall) ही अँकर गुंतवणूकदारांच्या (Anchor Investor) विक्रीमुळे झाली असल्याची चर्चा आहे. एलआयसी आयपीओमधील (LIC IPO) अँकर गुंतवणूकदारांचा 30 दिवसांचा लॉक-इन पीरिअड आज संपला. त्यामुळे अँकर गुंतवणूकदारांनी आतापर्यंतचा तोटा बुक करून यातून बाहेर पडणे पसंत केले. परिणामी जोरदार विक्री झाली आणि एलआयसीच्या शेअर आज 41.45 रूपयांनी खाली आला.

दरम्यान, एलआयसीच्या शेअर्समधील सततच्या घसरणीवर केंद्रीय सचिव तुहिन कांता पांडे यांनी, ही तात्पुरती घसरण असल्याचे म्हटले होते. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचे दिसून येत आहे. सातत्याने घसरण होत असलेल्या एलआयसीच्या शेअरबाबत काही सरकारी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

शेअर्समधील सततच्या घसरणीमुळे 'एलआयसी'च्या बाजार मूल्यात देखील मोठी घट झाली आहे. 'एलआयसी'चे बाजार मूल्य 4.34 लाख कोटींपर्यंत खाली आले. महिन्याभरापूर्वी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या शेअर्समध्ये 28 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. 872 रुपयांवर सूचीबद्ध झालेल्या शेअर्सची किंमत आज 668.25 रूपयांपर्यंत खाली आहे. एलआयसी आयपीओसाठी प्रति शेअरची किंमत 949 रुपये निश्चित करण्यात आली होती. शेअर्समधील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे महिन्याभरात दीड लाख कोटींहून अधिक रूपयांचे नुकसान झाले.