एलआयसीने बंद असलेल्या विमा पॉलिसी सुरु करण्याची संधी ग्राहकांना दिली आहे. खास विमा पॉलिसी पुनरुज्जीवन मोहीमेत अर्ज भरल्यानंतर ग्राहकांना विमा पॉलिसी सुरु करता येणार आहे. विमा पुनरुज्जीवन मोहीम 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. (LIC Lapsed Policy Revival)
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी विमा बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. विमा बाजारपेठेतील जवळपास 70% हिस्सा एलआयसीचा आहे. एलआयसीचे भारतात कोट्यवधी ग्राहक आहेत.
विमा पॉलिसी घेतल्यानंतर नियमित प्रीमियम भरणे अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे पॉलिसी सक्रिय राहते. मात्र वेळेवर प्रीमियम भरला नाही तर पॉलिसी रद्द किंवा लॅप्स होण्याची शक्यता आहे. अशा पॉलिसीधारकांसाठी पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी एलआयसीने आणली आहे.
एलआयसीच्या सर्वच ब्रांचमध्ये सध्या विमा पॉलिसी पुनर्जिवीत करण्याची मोहीम सुरु आहे. ही मोहीत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. यात बंद असलेली विमा पॉलिसी प्रीमियम आणि दंडात्मक रक्कम भरुन सुरु करता येणार आहे.
विमा पॉलिसी सक्रिय असेल तरच ग्राहकाला विम्यातील भरपाई आणि इतर लाभ मिळतात. त्यामुळे बंद पॉलिसी ठेवणे ग्राहकासाठी नुकसानदायक आहे. एलआयसी पॉलिसी पुनर्जिवीत करण्यासाठी ग्राहकाला ज्या शाखेतून पॉलिसी काढलेली आहे तिथे जाऊन अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी ओरिजनल विमा पॉलिसी आणि आधारकार्ड तसेच महत्वाचे केवायसी डॉक्युमेंट सादर करावे लागतील. एलआयसी अधिकाऱ्याकडून अर्जाची छाननी केली जाईल. तुम्ही सादर केलेले कारण पटल्यानंतर तुमची पॉलीसी पुनर्जिवीत केली जाईल.