भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (LIC) सध्या बंद किंवा रद्द झालेल्या आयुर्विमा पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची मोहीम सुरु आहे. पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता एलआयसीने विलंब शुल्कावर सवलत देण्याच निर्णय घेतला आहे. एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी 4000 रुपयांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
एलआयसीच्या ग्राहकांना 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी आहे. या खास रिव्हाव्हल स्कीमसाठी एलआयसीने डिस्काउंट ऑफर केला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या पॉलिसींवर विलंब शुल्क आकारले जाते. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही ग्राहक दंड भरणे टाळण्यासाठी पॉलिसी पुन्हा सुरु करत नाहीत. हीच बाब लक्षात घेत आयुर्विमा महामंडळाने विलंब शुल्काल सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
पॉलिसी घेतल्यानंतर किमान पाच वर्ष प्रीमियम न भरलेल्या ग्राहकांना पॉलिसी पुनरुज्जीवित करताना विलंब शुल्कात 4000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल, असे एलआयसीने म्हटले आहे. एलआयसीने X या सोशल मिडिया हॅंडलवर याबाबत माहिती दिली आहे.
ग्राहकांना तीन प्रकारात विलंब शुल्कात सवलत दिली जाणार आहे. त्यानुसार 100000 रुपये प्रिमीयम थकबाकी असणाऱ्या पॉलिसींवरील विलंब शुल्कात 30% सवलत दिली जाईल. त्यानुसार ग्राहकांची 3000 रुपयांची बचत होणार आहे.
बंद असलेल्या एआयसीचा 100001 रुपयांपासून 300000 रुपयांपर्यंत प्रीमियम थकबाकी असल्यास त्यावरील विलंब शुल्कावर 30% सवलत दिली जाणार आहे. यातून विमा पॉलिसी पुन्हा सुरु करणाऱ्या ग्राहकांचा 3500 रुपयांचा फायदा होणार आहे. 300000 रुपयांहून अधिक प्रीमियम भरणा बाकी असलेल्या ग्राहकांना विलंब शुल्कावर 30% सवलत मिळेल. यातून ग्राहकांची 4000 रुपयांची बचत होणार आहे.
LIC पॉलिसीची अपडेट घ्या व्हॉट्सअपवर
एलआयसीने व्हॉट्सअप सेवा सुरु केली असून यात ग्राहकांना पॉलिसी संदर्भातील 11 सेवा दिल्या जातात. एलआयसी व्हॉट्सअप सेवा घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
- मोबाईल क्रमांक 8976862090 यावर Hi मेसेज करा.
- यानंतर एलआयसीकडून 11 पर्याय दिले जातील.
- व्हॉट्सअपमधून तुम्हाला पॉलिसीबाबतची कोणती माहिती हवी आहे ती विचारु शकता.