एलआयसी हौसिंग फायनान्स या वित्त पुरवठादार कंपनीकडून गृह सुविधा होम लोन (LIC HFL Griha Suvidha Home Loan) दिले जाते. या योजनेत कर्जदाराला 7.65% दराने गृह कर्ज जास्तीत जास्त 30 वर्षांसाठी मिळते.
वैयक्तिक कर्जदार, नोकरदारांना घर खरेदीसाठी एलआयसी हौसिंग फायनान्सकडून गृह सुविधा होम लोन योजनेत 10 लाखांपासून 3 कोटींपर्यंत कर्ज दिले जाते. गृह सुविधा होम लोन योजनेत कर्ज घेण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते जाणून घेऊया.
एलआयसी गृह सुविधा होम लोन योजनेसाठी कर्जदाराचा सिबील स्कोअर 600 ते 700 या दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेतून प्रधानमंत्री आवास योजना क्रेडीट लिंक सबसिडी स्कीमसाठी गृह कर्ज मंजूर केले जाते.
एलआयसी हौसिंग प्राईम लेंडिंग रेट हा 14.70% इतका आहे. नोकरदार किंवा व्यावसायिक सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी 10 ते 50 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी किमान 600 ते जास्तीत जास्त 700 इतका सिबील स्कोअर आवश्यक आहे. यात 700 सिबील स्कोअर असणाऱ्या कर्जदारांना 7.15% दराने कर्ज मंजूर केले जाते. 600 सिबील स्कोअर असणाऱ्या कर्जदारांना 7.75% या व्याजदराने कर्ज मंजूर केले जाते.
गृह सुविधा होम लोन योजनेत 50 लाखांहून अधिक आणि 1 कोटींहून कमी रकमेच्या होम लोनसाठी कर्जाचा दर 7.15% ते 7.95% या दरम्यान आहे. 1 कोटींहून अधिक आणि 3 कोटींपर्यंतच्या गृह कर्जासाठी इंटरेस्ट रेट 7.15% ते 7.95% या दरम्यान आहे.
विद्यमान कर्जदार ज्यांना अतिरिक्त गृह कर्जाची गरज आहे, असेही कर्जदार एलआयसी हौसिंग फायनान्स गृह सुविधा होम लोनसाठी अर्ज करु शकतात. या कर्ज योजनेत 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कर्जाच्या रकमेवर 0.50% प्रोसेसिंग फि आकारली जाते. यात किमान 5000 ते कमाल 15000 रुपये यापैकी जी कमी असेल ती लागू होते.1 कोटींहून अधिक रकमेच्या कर्जावर 0.25% प्रोसेसिंग फि किंवा 50000 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क लागू होते.
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- कर्जदाराचे 6 ते 12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट आवश्यक आहेत.
- मागील तीन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न्स
- नोकरदार असल्यास सॅलरी स्लीप
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- राहण्याचा पत्ता दर्शवणारा पुरावा
- अर्जदार अनिवासी असल्यास त्याचा पासपोर्ट
- बिल्डर किंवा सोसायटीचे अलॉटमेंट लेटर
- फ्लॅट खरेदी केल्याचा पुरावा - अॅग्रीमेंट
- कर भरल्याच्या ओरिजनल रिसिप्ट्स