भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात विश्वासार्ह विमा कंपनी आहे. भारतीय विमा बाजारात 'एलआयसी'चे वर्चस्व आहे. एलआयसीने ग्राहकांच्या गरजा ओळखून अनेक नवीन विमा उत्पादने बाजारात आणली आणि त्याला ग्राहकांनी डोक्यावर घेतला. त्यातील निवडक 'एलआयसी' पॉलिसींची माहिती घेऊया.
विमा पॉलिसी घेणे ही गुंतवणूक नसून तुमच्या आयुष्यासाठी केलेली आर्थिक सुरक्षेची तजवीज आहे. बाजारात शेकडो विमा प्लॅन्स आहेत. मात्र तरिही बहुतांश जण विमा पॉलिसी खरेदी करताना गडबड करतात. कालांतराने त्यांच्या लक्षात येते की घेतलेली विमा पॉलिसी आपल्यासाठी दिर्घकालावधीत योग्य नाही. त्यामुळे विमा घेण्यापूर्वी त्या योजनेची किमान माहिती घेणे आवश्यक आहे.
'एलआयसी'च्या अनेक विमा योजना लोकप्रिय ठरल्या आहेत. 'एलआयसी'च्या विमा योजनांच्या धर्तीवर इतर कंपन्यांनी तशा प्रकारची विमा उत्पादने बाजारात लॉंच केली. 'एलआयसी'च्या विमा योजनांची खासियत म्हणजे 'एलआयसी'ची विश्वासार्हता आहे.
Table of contents [Show]
'एलआयसी' जीवन अमर
'एलआयसी' जीवन अमर ही प्युअर टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे. यात किमान प्रीमियममध्ये कमाल सम इन्शुरर्डचे कव्हर दिले जाते. ही पॉलिसी किमान 10 वर्ष तर कमाल 40 वर्षांपर्यंत दिला जातो. 'एलआयसी' जीवन अमर योजनेसाठी 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाच्या 65 वर्षापर्यंत तुम्हाला ही पॉलिसी घेता येते. वयाच्या 80 वर्षापर्यंत पॉलिसीधारकाला विमा सुरक्षा मिळते. यात किमान 25 लाखांपासून विमा पॉलिसी काढता येते.
‘एलआयसी’ टेक टर्म प्लॅन
एलआयसीचा आणखी एक भन्नाट टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 10 ते 40 वर्षांपर्यंत विमा सुरक्षा पुरवली जाते. यात वयाच्या 80 वर्षांपर्यंत विमा सुरक्षा दिली जाते. मॅच्युरिटीवेळी विमाधारकाला किमान 50 लाखांपासून विमा पॉलिसी काढता येते.
‘एलआयसी’ जीवन आनंद
एन्डॉवमेंट प्रकारातील सर्वात लोकप्रिय विमा पॉलिसी म्हणून एलआयसी जीवन आनंद ओळखली जाते. विमा सुरक्षेबरोबरच बचतीची संधी या योजनेतून मिळते. 18 ते 50 वयोगटातील व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकतात. यात 15 ते 35 वर्ष कालावधीचा विमा मिळतो. वयाच्या 75 वर्षाला या योजनेत मुदतपूर्ती होते. ही योजना एक लाख रुपयांच्या विमा सुरक्षेपासून पुढे किती रुपयांमध्ये घेता येईल.
'एलआयसी' जीवन उमंग
एलआयसी जीवन उमंग ही आयुष्यभरासाठी विमा सुरक्षा आणि एन्डॉवमेंटचे लाभ देणारी विमा योजना आहे. या योजनेत विमा सुरक्षेबरोबरच विमा धारकाला बचत देखील करता येते. वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत यातून विमा सुरक्षा पुरवली जाते. ही पॉलिसी 90 दिवसांच्या बाळापासून 55 वयापर्यंतच्या ग्राहकाला घेता येईल. दोन लाखांपासून ही विमा पॉलिसी घेता येईल.
एलआयसी न्यू चिल्ड्रेन मनीबॅक प्लॅन
खास लहान मुलांसाठी एलआयसीने मनीबॅक चाईल्ड प्लॅन विमा योजना तयार केली आहे. या योजनेत मुलांच्या आर्थिक सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्यांचे भविष्य सुरक्षित करायचे आहे अशांसाठी एलआयसी न्यू चिल्ड्रेन मनीबॅक प्लॅन सर्वोत्तम विमा योजना आहे. अगदी नवजात बालकापासून 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना या योजनेत सहभागी होता येईल. या योजनेचा कालावधी जास्तीत जास्त 25 वर्षांचा असेल. किमान 1 लाखांपासून विमा पॉलिसी घेता येईल.