डोअरस्टेप बँकिंग सुविधेचा पर्याय उपलब्ध करुन देताना, बँकेचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन बँकिंग सेवा पुरवतात. त्यामध्येही ज्येष्ठ नागरिक,दिव्यांगजन, गंभीर आजाराने त्रस्त,चालणे अशक्य असलेल्या अशा ग्राहकांना बँकांच्या वतीने ही सेवा दिली जाते. यामध्ये खाते उघडण्यापासून ते कर्ज देण्यापर्यंत विविध सुविधांचा समावेश असतो. काही बँका यासाठी शुल्क आकारतात, तर काही बँका ज्येष्ठ नागरिकांना तसेच अत्यंत गरजू व्यक्तींना निशुल्क सेवा देतात. मात्र एसबीआय,एचडीएफसी आणि कॅनरा बँक डोअरस्टेप बँकिंगसाठी वेगवेगळे शुल्क आकारते.
Table of contents [Show]
एसबीआय बँक
एसबीआयच्या डोअरस्टेप बँकिंग ( एसबीआय डीएसबी सर्व्हिस) सेवेकरीता,आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी सेवा शुल्क ७५ रुपये प्रति सेवा आणि जीएसटी आकारला जातो. तसेच, ग्राहकांना पासबुक, चेक किंवा पैसे काढण्याचा फॉर्म भरुन पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल. रोख पैसे काढण्याची आणि रोख ठेवीची रक्कम प्रति व्यवहार प्रतिदिन 20,000 रुपये इतकी मर्यादित आहे.
एचडीएफसी बँक
70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एचडीएफसी बँक डोरस्टेप बँकिंग सेवांचा मोफत देतात. तर 70 वर्षांपेक्षा कमी वयाचे ग्राहक कॅश पिक-अप: प्रति कॉल 200 रुपये घेतात. तर, कॅश डिलिव्हरीसाठीही, जीएसटीसह प्रत्येक वेळी 200 रुपये मोजावे लागतात. त्याचप्रमाणे, इन्स्ट्रुमेंट पिकअपसाठी, प्रत्येक जीएसटीसह 100 रुपये शुल्क भरावे लागेल. ज्यामध्ये,त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा केली जाते. कॅश पिकअपसाठी किमान रक्कम 5,000 रुपये आहे, तर कमाल रक्कम 25,000 रुपये आहे.
अर्ज कसा करायचा
जर तुम्ही विद्यमान बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही डोअरस्टेप बँकिंग सेवांचा सहज लाभ घेऊ शकता. अर्ज करण्यासाठी,तुमच्या बँकेच्या फोन बँकिंग नंबर 1800 202 6161 / 1860 267 6161 वर कॉल करा. यावर तुम्ही डोरस्टेप बँकिंगसाठी नोंदणी करू शकता.
कॅनरा बँक
कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना कॉल सेंटर,मोबाईल अॅप आणि DSB वेब पोर्टलद्वारे घरोघरी बँकिंग सेवांचा लाभ घेण्याचा पर्याय देते. बँकेच्या DSB सेवा सर्व वैयक्तिक श्रेणीतील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. कॅनरा बँक प्रत्येक व्यवहारासाठी 75 रुपये आणि GST आकारते. हे शुल्क सगळ्यांसाठी आकारले जाते.
डोअरस्टेप बँकिंग सेवांची यादी
- चेक,ड्राफ्ट,पे ऑर्डर इत्यादी स्विकारणे.
- विनंती खाते विवरण (Request Account Statement).
- नवीन चेकबुकची मागणी.
- नॉन-पर्सनलाइझ चेक बुक्स,मसुदा, पे ऑर्डर,मुदत ठेव पावत्या/पोचपावती इत्यादींचे वितरण.
- 15G, 15H फॉर्म स्वीकारणे.
- आयटी चलन,सरकारी व्यवसाय, जीएसटी स्वीकारणे.
- टीडीएस,फॉर्म 16 प्रमाणपत्र जारी करणे.
- प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, गिफ्ट कार्डचे वितरण.
- स्थायी सूचना जारी करणे.
- डिजिटल लाइफ प्रमाणपत्र सादर करणे.
- रोख पैसे काढण्याची किमान मर्यादा 1,000 रुपये आणि कमाल मर्यादा 10,000 रुपये आहे.