Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

1000 Note Value 3 Lakh: जाणून घ्या, 1000 रूपयाच्या नोटेची किंमत 3 लाख रूपये!

1000 Note Value 3 Lakh

Currency Note Latest News: तुम्ही म्हणाल, आपल्याकडे तर 1000 रूपयांची नोट बंद आहे, मग या 1000 च्या नोटेवर 3 लाख रूपये कसे मिळणार? हीच तर गंमत आहे, चला तर मग या हजारच्या नोटेसंबंधी सविस्तर जाणून घेऊयात.

Viral News in Marathi: काही लोकांना जुन्या-पुराण्या व आकर्षिक नंबरच्या नोटा जमा करून ठेवण्याचा छंद असतो. पण जरी तुमच्याकडे ही हजारची नोट असेल, तरी याची किंमत पूर्णपणे झिरो आहे. कारण ही गोष्ट आहे ब्रिटनची. या देशात विशेष नंबरची नोट व नाण्यांची किंमत अधिक असल्याचे सांगितले जाते. अशाच एका नाण्याची किंमत 1000 पट जास्त होती. आता अशीच एक हजारची नोट समोर आली आहे, तिच्या खास नंबरमुळे. या नोटेची किंमत सुमारे 3 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हायरल बातमीबद्दल अधिक जाणून घेऊयात.

 काय आहे खास नंबर (What is the Special Number)

आता ब्रिटनमध्ये रुपया तर चालत नाही. त्या देशातील चलन हे पाउंड स्वरूपात असते. त्यामुळे जर तुमच्याकडे 10 पौंड म्हणजे 1000 रूपये किंमतीची नोट असेल आणि त्या नोटेवरील नंबर हा AH17 75 असेल, तर त्या नोटेची किंमत सुमारे 3 ते 3.5 लाख रुपये असेल.

हा नंबर खास का आहे? (Why is this Number Special)

जेन ऑस्टेन ही एक प्रसिद्ध इंग्रजी लेखिका होती. त्यांचा जन्म 1775 मध्ये झाला आणि 1817 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. हा खास नंबर जेन ऑस्टेनच्या जन्म आणि मृत्यूच्या वर्षानुसार बनविण्यात आला होता. याशिवाय, 28 जानेवारी 1813 रोजी जेन ऑस्टेनचे सर्वात प्रसिद्ध साहित्य ‘प्राइड अँड प्रिज्युडिस’ (Pride And Prejudice) प्रकाशित झाले होते. या नंबरशी संबंधित असणाऱ्या नोटेलादेखील सर्वाधिक मागणी असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी खास असणारे नाणे (An Even more Special Coin)

देशात आणखी ही असे खास नाणे आहे, ज्याला अधिक किंमत आहे. 20 पेन्स (सुमारे 20 रुपये) चे एक नाणे आहे, ज्याची किंमत सुमारे 75 हजार रुपये आहे. 50 पेन्सचे ही आणखी एक असे नाणे आहे, ज्याची विक्री 50 हजार पेक्षा ही अधिक रुपयांत झाली आहे.