Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Credit Cards: भारतातील टॉप 10 क्रेडिट कार्ड्स जाणून घ्या

Best Credit Cards in India

Best Credit Card: भारतात क्रेडिट कार्डचे भरपूर पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. पण त्यातून नेमके आणि चांगले क्रेडिट कार्ड निवडणे हे तितकेच जिकरीचे आहे. तर आम्ही तुमच्यासाठी क्रेडिटचे प्रकार, कंपन्या, ऑफर्स आणि त्यातील कॅटेगरीची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

Best Credit Card: भारतात क्रेडिट कार्डचे भरपूर पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. पण त्यातून नेमके आणि चांगले क्रेडिट कार्ड निवडणे हे तितकेच जिकरीचे आहे. तर आम्ही तुमच्यासाठी क्रेडिटचे प्रकार, कंपन्या, ऑफर्स आणि त्यातील कॅटेगरीची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार्ड्समधून बेस्ट क्रेडिट कार्ड जाणून घेण्यापू्र्वी क्रेडिट कार्डबद्दलची बेसिक माहिती आपण जाणून घेऊ. क्रेडिट कार्डला प्लॅस्टिक कार्डदेखील म्हटले जाते. क्रेडिट कार्ड खिशात असताना तुम्हाला खरेदीसाठी रोख रक्कम बाळगण्याची गरज पडत नाही.तसेच खरेदीसाठी खर्च केलेले पैसे 45 दिवसांपर्यंत बिनव्याजी वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने एटीएममधून पैसेसुद्धा काढू शकता. पण यासाठी बँक भरपूर पैसे चार्ज करते.

डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्डद्वारे अनेक सुविधा मिळत असल्याने,बरेच जण जास्तीची फी भरून क्रेडिट कार्ड घेणे पसंत करतात. पगारदार व्यक्तींकडून क्रेडिट कार्डल खूप मागणी असते. पण नेमकं कोणत्या कंपनीचे कार्ड वापरायचं याबाबत अनेकांचे प्रश्न असतात. पण याचं नेमकं उत्तर देता येत नाही. कारण प्रत्येकाला लागू होईल असं एक कार्ड उपलब्ध नाही. प्रत्येक कार्डची खासियत वेगवेगळी असते. त्यानुसार त्यावर ऑफर्स आणि फायदे मिळतात.

भारतातील टॉप 10 क्रेडिट कार्ड्स

पगारदार व्यक्तींसाठी बेस्ट कार्ड

पगारदार व्यक्तींसाठी  3 कंपन्यांची क्रेडिट कार्ड बेस्ट ठरू शकतात. यामध्ये Standard Chartered Platinum Rewards Card, Axis Bank Insta Credit Card आणि Citibank Cashback Credit Card या तीन कंपन्यांच्या कार्डचा समावेश होतो.

विद्यार्थ्यांसाठी बेस्ट कार्ड

विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षण घेणाऱ्यांसाठी ICICI Instant Platinum Card आणि SBI Student Plus Advantage Card ही 2 कार्ड्स बेस्ट आहेत. ही कार्ड खास विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच मार्केटमध्ये आणण्यात आली आहेत. या कार्डवर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना या कार्ड्सचा चांगला उपयोग होऊ शकतो.

शॉपिंग कार्ड्स

सध्या ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या डेबिट/क्रेडिट कार्डवर डिस्काउंट ऑफर्स किंवा कॅशबॅक सुविधा दिली जाते. त्यासाठी Standard Chartered Manhattan Credit Card, SBI Simply Click Credit Card आणि Citibank Cashback Credit Card या 3 कार्डचा उपयोग होऊ शकतो. या कार्डच्या मदतीने शॉपिंगवर खूप साऱ्या ऑफर्सचा लाभ घेता येईल.

ट्रॅव्हल कार्ड

शॉपिंग कार्डप्रमाणेच ट्रॅव्हल क्रेडिटचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला तर पैशांच्या बचतीबरोबरच वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभही घेता येतो. खास करून ट्रॅव्हलिंग करताना पैसे बाळगणे किंवा एटीएमचा वापर करणे शक्य नसते. अशावेळी ट्रॅव्हल कार्डची खूप मदत होते. यासाठी Indian Oil Titanium Citibank Credit Card आणि HDFC Platinum Plus Credit Card या 2 कार्डचा वापर करता येऊ शकतो.

क्रेडिट कार्ड वापरण्यापूर्वी 'हे' लक्षात घ्या

क्रेडिट कार्डचा वापर करताना त्याचा विपरित परिणाम आपल्या क्रेडिट स्कोअरवर होणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे. क्रेडिटचा कार्डचे बिल वेळेवर भरले गेले नाही तर त्यावर चक्रवाढ पद्धतीने दंड आकारला जातो. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअरसुद्धा खराब होऊ शकतो. त्यामुळे वापरण्यास सोपे आणि परवडेल अशा गोष्टींसाठीच क्रेडिट कार्डचा वापर करावा.

क्रेडिट कार्डची सुविधा ही मोफत दिली जात नाही. क्रेडिट कार्ड ही बँकिंग सिस्टिममधील प्रीमिअम सुविधा आहे. यासाठी बँका प्रत्येक ग्राहकाकडून वर्षाला विशिष्ट रक्कम फी म्हणून घेते. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना त्याची वार्षिक फी, त्यावर मिळणारे रिवॉर्ड्स पॉईंण्ट्स, कॅशबॅक ऑफर या तपासून घेणे आवश्यक आहे.

क्रेडिट कार्डवर केलेल्या खरेदीवर ग्राहकांना 45 दिवसांचे क्रेडिट मिळते. म्हणजे 45 दिवस बिनव्याजी तुम्ही ते पैसे वापरू शकता. पण याच्या बिलाची तारीख चुकवली तर मात्र बँक त्याच्याकडून भरपूर पैसे आकारते. याचा व्याजदर पर्सनल लोनच्या व्याजदरापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्यामुळे क्रेडिट कार्डची निवड आणि वापर योग्य माहिती घेऊनच करावा.