Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electric Shawl in Cold: जाणून घ्या, थंडीपासून संरक्षणासाठी इलेक्ट्रिक शालची किंमत

Electric Shawl in Cold

Image Source : http://goldair.co.nz/

Electric Shawl in Cold: जर या थंडीमध्ये शेकोटी न पेटवता थंडीपासून संरक्षण करायचे असेल, तर थेट बाजारात आता इलेक्ट्रिक शाल आली आहे. या शालची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन होते. एवढेच नाही, तर यावर आकर्षक ऑफरदेखील आहे. चला, तर मग जाणून घेवुयात, या इलेक्ट्रिक शालविषयी.

Electric Shawl Price: सध्या थंडी खूप वाढली आहे. घराबाहेरदेखील पडू वाटत नाही. आता या थंडीचे काय करावे, असा प्रश्न पडला असेल, तर नो टेंशन! कारण आता थंडीपासून संरक्षणासाठी बाजारात थेट ‘इलेक्ट्रिक शाल’ (Electric Shawl) आली आहे. या शालचे नाव आहे ‘USB इलेक्ट्रिक हीटिंग शाल.’ ही शाल आपल्या बॉडीला थंडीपासून वाचविण्यासाठी गरम ठेवते. जेणेकरून तुम्हाला बिलकूच थंडी वाजणार नाही. चला, तर मग जाणून घेऊयात, या इलेक्ट्रिक शालविषयी....

किंमत व कुठे मिळेल (Price and Where to Get it)

USB इलेक्ट्रिक शाल ही विक्रीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीं बाजारात उपलब्ध आहे. या शालवर अनेक आकर्षक ऑफरदेखील आहे. जिथे तुम्हाला अनेक आकर्षक सूट (Discount) चा लाभ होऊ शकेल. तुम्ही ही इलेक्ट्रिक शाल कमी किंमतीत खरेदी करू शकता. ही USB इलेक्ट्रिक हीटिंग शाल विक्रीसाठी अमेझॉनवर (Amazon) या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या USB इलेक्ट्रिक शालमध्ये अनेक व्हरायटीदेखील आहेत. या इलेक्ट्रिक शालची किंमत 6000 ते  12000 रूपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे या शालवर मोठी सूटदेखील मिळत आहे. 

काय आहे खासियत (What is the Specialty)

USB इलेक्ट्रिक शालविषयी सांगायचे तर, या शालची साइज 1000 बाय 700 मिलीमिटीर आहे. या शालमध्ये हीटिंग लाइनिंग, हीटिंग पॅड व स्विच कंट्रोलर दिले गेले आहे. ही शाल अमेझॉनवर निळा, ब्राउन व ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे. ही शाल सुरू करण्यासाठी तुम्हाला USB केबलला पावर बॅंक, लॅपटॉपसारख्या डिव्हाइसला कनेक्ट करावे लागेल. ही शाल थेट चार्जरला कनेक्ट करूनदेखील वापरता येणार आहे. ही इलेक्ट्रिक शाल तुम्ही उशी म्हणून डोक्याखालीदेखील घेऊ शकता. कंपनीचा दावा आहे की, ही शाल कार, ऑफिस व अनेक ठिकाणीदेखील वापरू शकता. आताच्या वाढत्या थंडीत या इलेक्ट्रिक शालचा नक्कीच फायदा होईल. थंडीपासून वाचण्यासाठी खरेदी करा ही इलेक्ट्रिक शाल, अगदी कमी किंमतीत.