Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Titan submarine : बेपत्ता टायटन पाणुबडीच्या संपूर्ण मोहिमेचा खर्च माहिती आहे का?

Titan Submersible

Image Source : www.scientificamerican.com

ओशनगेट या कंपनीची टायटन पाणबुडी (Titan Submarine) रविवारी (18 जून) कॅनडाच्या समुद्र हद्दीत बेपत्ता झाली होती. त्यानंतर विविध देशाच्या संयुक्त विद्यमाने टायटन पाणबुडीचा (Titan submarine) शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. अटलांटिक महासागरात बेपत्ता झालेल्या या पाणबुडीमध्ये 5 अरबपती व्यक्ती प्रवास करत होत्या. त्या पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याचे ओशनजेट कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.

टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी (TITANIC Mission) आयोजित मोहिमेवरील ओशनगेट या कंपनीची टायटन पाणबुडी (Titan  submarine) रविवारी (18 जून) कॅनडाच्या समुद्र हद्दीत बेपत्ता झाली होती. त्यानंतर विविध देशाच्या संयुक्त विद्यमाने टायटन पाणबुडीचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. अटलांटिक महासागरात बेपत्ता झालेल्या या पाणबुडीमध्ये 5 अब्जाधीश व्यक्ती प्रवास करत होत्या. त्या पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याचे ओशनजेट (OceanGate) कंपनीकडून जाहीर करण्यात आले  आहे. दरम्यान, टायटॅनिक जहाजांचे अवशेष पाहायला जाण्यासाठी आणि बेपत्ता झाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेला किती खर्च आला याबाबत आपण जाणून घेऊयात.

पाणबुडीतील पाच अब्जाधीश प्रवासी कोण होते? five billionaire travelers

पाणबुडीतील पाच अब्जाधीश प्रवासी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेले होते.त्यामध्ये पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश अब्जाधीश प्रिन्स दाऊद (अँग्लो कॉर्पचे उपाध्यक्ष)आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, तसेच ब्रिटीश अब्जाधीश हमिश हार्डिंग, फ्रेंच पर्यटक पॉल- हेन्री नार्गिओलेट आणि ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश यांचा समावेश होता.

प्रत्येकी 2 कोटीचे तिकीट Rupees 2 crore ticket

Oceangate कंपनीने अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम आकारले होते. टायटन पाणबुडीतून (Titan  submarine) प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ओशनजेटने प्रत्येकी 2 कोटी 4 लाख रुपये तिकीट आकारले होते. हा संपूर्ण प्रवास आठ दिवसांचा होता.ही रक्कम फक्त पाणबुडीतून प्रवास करण्यासाठी आकारण्यात आली होती. बाकीचा इतर खर्च यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नव्हता.

शोध मोहिमेचा खर्च 53 कोटी

अमेरिकन कंपनी OceanGate चा वार्षिक उत्पन्न हे 9.9 मिलियन डॉलर आहे. दरम्यान, टायटन पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोध मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे.आतापर्यंत या शोध मोहिमेत जवळपास 6.5 मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 53,33,32,800 रुपये पेक्षा अधिक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कसा झाला अपघात- 

टायटॅनिक (TITANIC ) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी जात असलेल्या टायटन पाणबुडीचा उत्तर अटलांटिक महासागरात प्रवासादरम्यान रविवारी 6 वाजता बेपत्ता झाले. मोहीम सुरू झाल्यानंतर एक तास 45 मिनिटाताच पाणबुडीचा संपर्क तुटला होता. त्यानंतर टायटन पाणबुडी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यासह अनेक देशांतील शोधकर्त्यांचे पथक शोध मोहिमेत सहभागी झाले. मात्र, 4 दिवस समुद्रात ती पाणबुडी कोणालाही सापडली नाही.बोस्टन कोस्ट गार्ड बचाव कार्याचे नेतृत्व करत होते. तसेच अमेरिकेच्या तटरक्षक दलाने पाणबुडीचा शोध घेण्यासाठी दोन सी-१३० हरक्यूलिस विमाने पाठवली होती.

ओशनगेटने प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे केले जाहीर-

आम्ही टायटन पाणबुडीतील सर्व प्रवासी गमावले आहेत.या अपघाताबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो.या दु:खाच्या प्रसंगी आमचे विचार त्या पाच प्रवाशांच्या कुटुंबियांसोबत आहेत, असे निवेदन कंपनीने गुरुवारी जारी केले आहे. मात्र हा भीषण अपघात कसा घडला याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

 टायटन पाणबुडी बद्दलची माहिती- Information about Titan

ओशनगेटच्या माहितीनुसार टायटनची लांबी 6.7 मीटर, तर रुंदी 2.8 मीटर आणि उंची 2.5 मीटर आहे. याचे एकूण वजन 10,432 किलोग्रॅम आहे आणि 685 किलोग्रॅम पर्यंत पेलोड क्षमता आहे.या संमर्सिबलचा पाण्याखाली वेग जास्तीत जास्त 3नॉट्स (सुमारे 5.5 किलोमीटर प्रति तास) इतका आहे. याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या पाणबुडीची लाइफ सपोर्ट सिस्टीम आहे.कंपनीच्या म्हणण्यानुसार 5 प्रवाशांना जास्तीत जास्त 96 तास पुरेल इतका ऑक्सिजन यामध्ये उपलब्ध राहतो. टायटन हे सबमर्सिबल पाच लोकांना 4,000 मीटर (13,123 फूट) खोलवर नेण्यासाठी सक्षम आहे. समुद्रातील साइटचे सर्वेक्षण आणि तपासणी, संशोधन आणि डेटा संकलन, चित्रपट आणि मीडिया निर्मिती आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या खोल समुद्रातील चाचणीसाठी डिझाइन करण्यात आले होते.