Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kahan Packaging IPO: कहान पॅकेजिंगचा आयपीओ 6 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला; प्रति शेअरची किंमत 80 रुपये

Kahan Packaging IPO

Image Source : www.moneycontrol.com/www.ipocentral.in

Kahan Packaging IPO: कहान पॅकेजिंगच्या इश्यूला ग्रे मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा आयपीओ बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग होणार आहे. कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून 5.76 कोटी रुपये उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे.

कहान पॅकेजिंग ही कंपनी 2016 पासून वेगवेगळ्या फॅब्रिकच्या पॅकेजिंग व्यवसायात कार्यरत आहे. कंपनीने व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने मार्केटमध्ये आयपीओ आणण्याचा विचार केला आहे. 6 सप्टेंबरपासून कहान पॅकेजिंगचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.

कहान पॅकेजिंगच्या इश्यूला ग्रे मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा आयपीओ बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग होणार आहे. कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून 5.76 कोटी रुपये उभारण्याचा विचार केला आहे.

गुंतवणूकदारांना 6 ते 8 सप्टेंबर या दरम्यान यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. याच्या एका शेअर्सची किंमत कंपनीने 80 रुपये निश्चित केली आहे. तसेच याच्या एका लॉटमध्ये 1600 शेअर्स असणार आहेत. म्हणजे गुंतवणूकदारांना यामध्ये पैसे गुंतवणण्यासाठी  किमान 1 लाख 28 हजार रुपये गुंतवावे लागतील.

कंपनीने 7.20 लाख शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. हे सर्व फ्रेश इश्यू आहेत. यातील 50 टक्के इश्यू हे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित आहेत. 13 सप्टेंबरला याचे वाटप केले जाणार असून, 18 सप्टेंबरला बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर याचे लिस्टिंग होणार आहे.

कहान पॅकेजिंगची आर्थिक स्थिती

कहान पॅकेजिंग कंपनी अॅग्रो प्रोडक्ट्स, सिमेंट, केमिकल, अन्न-धान्य इंडस्ट्रीसाठी लागणारे पॅकेजिंग मटेरिअल पुरवते. या कंपनीची फॅक्टरी ठाणे जिल्ह्यातील आसनगाव येथे आहे. कंपनी आता व्यवसाय विस्तारासाठी प्रयत्न करत आहे. 2020 मध्ये कंपनीला अवघा 1.05 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. त्यात मार्च, 2022 मध्ये वाढ होऊन तो 19.77 लाखावर पोहोचला. तर डिसेंबर, 2022 मध्ये त्यात आणखी वाढ झाली असून तो 57.35 लाखा झाला आहे.