Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jupiter Hospital IPO: ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलचा आयपीओ 6 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

Jupiter Hospital IPO

Jupiter Hospital IPO: ज्युपिटर लाईफ लाईन या प्रायव्हेट हॉस्पिटल चेनने मार्केटमध्ये आपला आयपीओ आणला आहे. हा आयपीओ 6 सप्टेंबर रोजी ओपन होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून हॉस्पिटल कंपनी 869 कोटी रुपये उभारणार आहे.

Jupiter Life Line Hospital IPO: ज्युपिटर लाईफ लाईन या प्रायव्हेट हॉस्पिटल चेनने मार्केटमध्ये आपला आयपीओ आणला आहे. हा आयपीओ 6 सप्टेंबर रोजी ओपन होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून हॉस्पिटल कंपनी 869 कोटी रुपये उभारणार आहे.

ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलने आयपीओच्या एका शेअरची किंमत 695-735 रुपये अशी निश्चित केली आहे. यामध्ये एकूण 1 कोटी 18 लाख शेअर्स उपलब्ध असणार आहेत. त्यातील 73.74 लाख शेअर्स हे फ्रेश इश्यू असणार आहेत. तर जवळपास 44.50 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत उपलब्ध असणार आहेत.

ऑफर फॉर सेल अंतर्गत देवांग गांधी हे हिंदू अविभक्त कुटुंब अंतर्गत असलेले त्यांच्याकडील 12.5 लाख शेअर्स विकणार आहेत. तर देवांग गांधी, नीता गांधी हे 9 लाख शेअर्स, नितीन ठक्कर आणि आशा ठक्कर हे त्यांच्याकडील 10 लाख शेअर्स विकणार आहेत. त्याचबरोबर अनुराधा मोदी, मेघा मोदी, भास्कर शहा हे आपल्याकडील प्रत्येक 4 लाखांपर्यंतचे शेअर्स विकणार आहेत.

ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलने ऑगस्ट महिन्यात प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे 123 कोटी रुपये उभे केले आहेत. यासाठी कंपनीने गुंतवणूकदारांना 16.7 लाख शेअर्स 735 रुपये प्रति किमतीने विकले होते.

या आयपीच्या एका लॉटमध्ये 20 शेअर्स असणार आहेत. यासाठी गुंतवणूकदारांना किमान 14,700 रुपये गुंतवावे लागणार आहेत. गुंतवणूकदारांना 8 सप्टेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येईल. 13 सप्टेंबरला आयपीओचे वाटप केले जाईल. त्यानंतर 14 सप्टेंबरला ज्यांना लॉट लागला नाही. त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील आणि 15 सप्टेंबरला ज्यांना लॉट लागला आहे. त्यांच्या डीमॅट खात्यात ते जमा केले जातील. 18 सप्टेंबरला याचे बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग होईल.

हॉस्पिटल या आयपीओतून मिळालेला निधी कर्ज परत करण्यासाठी वापरणार आहे. त्याचबरोबर काही निधी हा कॉर्पोरेट उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. सध्या या कंपनीची 3 हॉस्पिटले असून त्यांच्या खाटांची क्षमता हजाराच्या घरात आहे. कंपनीच्या महसुलात मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी वाढ झाली आहे. यावर्षी कंपनीला 892.54 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यातील 72.91 कोटी रुपयांचा कंपनीला निव्वळ नफा झाला आहे.