Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

JSW Infrastructure IPO: JSW इन्फ्रास्ट्रक्चर आयपीओ आणणार! 2800 कोटी भांडवली बाजारातून उभारण्याची योजना

JSW Infrastructure IPO

JSW Infrastructure कंपनी लवकरच IPO आणणार आहे. भांडवली बाजारातून 2,800 कोटी उभारण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. आयपीओ संबंधित कागदपत्रे कंपनीने सेबीकडे जमा केल्याची माहिती सुत्रांनी दिली. पायाभूत सुविधा उभारणी व्यवसायात वाढ करण्यासाठी IPO आणत असल्याची माहिती समोर आली आहे.

JSW Infrastructure IPO: JSW Group मधील JSW Infrastructure ही कंपनी लवकरच आयपीओ आणणार आहे. भांडवली बाजारातून 2,800 कोटी उभारण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. आयपीओ संबंधित DRHP कंपनीने सेबीकडे सादर केल्याची माहिती सुत्रांनी दिली. बंदरे (पोर्ट) बांधण्यासाठी कंपनी भांडवली बाजारातून पैसे उभे करत असल्याची माहिती समोर आली आहे.

पायाभूत सुविधा व्यवसाय वाढीवर कंपनीचे लक्ष

आयपीओबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही. IPO मधून मिळणाऱ्या पैशातून कंपनी कर्ज चुकते करण्याबरोबरच पायाभूत सुविधा प्रकल्प वाढीवर लक्ष केंद्रित करणार आहे. जेएसडब्लू एनर्जी आणि जेएसडब्लू स्टील या दोन कंपन्या भांडवली बाजारावर आधीपासून सूचिबद्ध असून आता तिसरी कंपनीही मार्केटमध्ये उतरणार आहे.

जेएसडब्लूचे प्रमोटर्स IPO आणल्यानंतर कंपनीमधील आपला हिस्सा कमी करणार नाहीत. तसेच या पब्लिक इश्यूसाठी जेएम फायनान्शिअल या बँकेची मदत घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बंदरावरील मालवाहतूक हातळणीच्या क्षमतेत वाढ केली होती. त्यासाठी कंपनीने 153.43 मिलियन इतका पैसा खर्च केला. ड्राय बल्क, ब्रेक बल्ट, लिक्विड बल्क, गॅसेस आणि कंटेनर्स असे सामान बंदारातून उतरवण्यासाठीच्या सुविधेत सुधारणा केली. 

बंदर विकासासाठी पैसा उभारणी

आयपीओद्वारे कंपनी आणखी काही बंदरांचा विकास करणार आहे. 31 डिसेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चरवरील कर्जाचा बोजा 2,875 कोटी रुपये होता. मागील वर्षीच्या आक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 447.2 कोटी रुपये होता.

JSW ग्रूप कंपनीचे इतर व्यवसाय कोणते?

JSW ग्रूपची 1982 साली सज्जन जिंदाल यांनी स्थापना केली असून कंपनी स्टील,  एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, पेंट, रियल्टी, स्पोर्ट्स आणि गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीची जगभर कार्यालये आहेत. देशातील आघाडीच्या 6 स्टील उत्पादक कंपन्यांमध्ये जेएसडब्लू कंपनीचा समावेश आहे.