Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

JSW Infra IPO: जिंदाल समूहाचा 13 वर्षानंतर IPO! जयगड बंदराच्या विस्तारासाठी जेएसडब्ल्यू इन्फ्रा शेअर विक्री करणार

JSW

JSW Infra IPO: जेएसडब्ल्यू इन्फ्राने विस्ताराचे नियोजन केले आहे. आयपीओमधून मिळणारे भांडवल कर्जाच्या परतफेडीसाठी आणि जयगड पोर्टच्या विस्तारासाठी खर्च केले जाणार असल्याचे कंपनीने आयपीओच्या माहिती पुस्तकात म्हटले आहे. जेएसडब्ल्यू इन्फ्राचे 880 कोटींचे कर्ज फेडले जाणार आहे. जयगड पोर्टसाठी 1029.04 कोटी खर्च केले जाणार आहेत.

जिंदाल समूहातील कंपनी 13 वर्षांनी प्राथमिक शेअर बाजारात धडकणार आहे. कोकणातील जयगड बंदराच्या विस्तारासाठी जेएसडब्ल्यू इन्फ्राकडून खुल्या बाजारात शेअरची विक्री केली जाणार आहे. जेएसडब्ल्यू इन्फ्राचा 2800 कोटींचा आयपीओ येत्या 25 सप्टेंबर 2023 रोजी खुला होणार आहे.

जेएसडब्ल्यू इन्फ्राकडून प्रती शेअर 113 ते 119 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. खुल्या शेअर विक्रीतून कंपनी 2800 कोटींचे भांडवल उभारणार आहे.

जेएसडब्ल्यू इन्फ्राच्या आयपीओमध्ये 10% शेअर्स वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 75% शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असून 15% शेअर्स बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

जेएसडब्ल्यू  इन्फ्राच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना किमान 126 शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. यासाठी 14994 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. जिंदाल समूहातून 13 वर्षांनी आणखी एक कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणार आहे. यापूर्वी 2010 मध्ये जेएसडब्ल्यू एनर्जी या कंपनीचा आयपीओ शेअर मार्केटमध्ये दाखल झाला होता.

जेएसडब्ल्यू इन्फ्राने विस्ताराचे नियोजन केले आहे. आयपीओमधून मिळणारे भांडवल कर्जाच्या परतफेडीसाठी आणि जयगड पोर्टच्या विस्तारासाठी खर्च केले जाणार असल्याचे कंपनीने आयपीओच्या माहिती पुस्तकात म्हटले आहे. जेएसडब्ल्यू इन्फ्राचे 880 कोटींचे कर्ज फेडले जाणार आहे. जयगड पोर्टसाठी 1029.04 कोटी खर्च केले जाणार आहेत.

आर्थिक आकडेवारीचा विचार केला तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीला 749.5 कोटींचा नफा झाला. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 126.8% वाढ झाली. कंपनीला 3194.7 कोटींचा महसूल मिळाला. त्यात आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत 40.5% वाढ झाली होती.