Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio Insurance : जिओ फायनान्स 2024 पर्यंत विमा क्षेत्रात उतरणार; परवान्यासाठी IRDAI कडे करणार अर्ज

Jio Insurance : जिओ फायनान्स 2024 पर्यंत विमा क्षेत्रात उतरणार; परवान्यासाठी IRDAI कडे करणार अर्ज

Image Source : www.businesstoday.in

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) या कंपनीमधून डिमर्ज केलेली संस्था आहे. नुकतेच म्हणजे 25 जुलैला या नवीन कंपनीचे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस असे नामकरण करण्यात आले. डिमर्ज झाल्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीकडून आता जनरल इन्शुरन्स (Genral Insurance) आणि लाईफ इन्शुरन्स (life insurance) ची सेवा सुरू करणार आहे.

विमा क्षेत्रामध्ये अनेक कंपन्याकडून सेवा दिली जाते. त्यामध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील दोन्ही कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांची जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही वित्तीय सेवा देणारी कंपनी देखील विमा क्षेत्रात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीकडून भारतीय विमा नियामक मंडळाकडे परवान्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी कंपनीकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.

JFS परवान्यासाठी IRDAI कडे करणार अर्ज

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) या कंपनीमधून डिमर्ज केलेली संस्था आहे. नुकतेच म्हणजे 25 जुलैला या नवीन कंपनीचे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस असे नामकरण करण्यात आले. डिमर्ज झाल्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीकडून आता जनरल इन्शुरन्स (Genral Insurance)  आणि लाईफ इन्शुरन्स (life insurance) ची सेवा सुरू करणार आहे. यासाठी कंपनीकडून लायसन्ससाठी IRDAI कडे अर्ज करण्यात येणार आहे. या संदर्भात ET Now या माध्यमाने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

2024 मध्ये सुरू होणार सेवा-

Jio Financial Services (JFS) कंपनीकडून विमा क्षेत्रातील सेवा सुरू करण्यासाठी एकूण 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विमा सेवा सुरू करण्यासाठी परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे 2024 मध्ये JFS ची विमा सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान रिलायन्स उद्योग समूहाकडून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच धमाकेदार प्लॅन दिले जातात. आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसकडून भविष्यात ग्राहकांना कोणकोणत्या सर्वसमावेशक विमा सुविधा दिल्या जातीस हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.