भारतातील स्वस्त फोन असलेल्या जिओ भारत 4G फोन ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. अॅमेझॉनवर येत्या 28 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजता जिओ भारत 4G फोनचा सेल सुरु होणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच जिओ भारत हा 4G फोन लॉंच केला होता. या फोनची किंमत 999 रुपये इतकी आहे. अद्याप हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाही. सुरुवातीला केवळ ऑनलाईन जिओ भारत 4G फोनची विक्री केली जाणार आहे.
जिओ भारत फिचर फोन जरी असला तरी यातून व्हॉटसअप चालवणे आणि मुव्ही पाहणे शक्य होणार आहे. स्मार्टफोनसारखी फिचर्स जिओ भारत 4G फोनमध्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी जिओ भारत 4G फोन उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
जिओ भारत 4G फोन लॉंच झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याची ऑनलाईन विक्री होणार आहे. अॅमेझॉनवर येत्या 28 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 पासून जिओ भारत 4G फोनची विक्री सुरु होणार आहे. याबाबत अॅमेझॉनच्या वेबसाईटवर टिझर प्रकाशित करण्यात आला आहे.
जिओ भारत 4G फोन हा रिलायन्स आणि कार्बन मोबाईल या कंपनीने मिळून विकसित केला आहे. या फोनच्या पृष्ठभागावर भारत असून मागील बाजूस कार्बनचा लोगो आहे. या फोनमध्ये जिओ सिनेमा हे अॅपचा समावेश करण्यात आला आहे.
जिओ भारत 4G फोनमध्ये 1.77 इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय या फोनमध्ये 128 जीबी मेमरी कार्ड ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे या फोनमध्ये युजरला डेटा साठवता येणार आहे. 1000mAh बॅटरी असलेल्या या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सेल सेन्सॉर आहे.
किती रुपयांचा रिचार्ज मारावा लागेल
जिओ भारत 4G फोनसाठी ग्राहकांना 123 रुपयांचा रिचार्ज मारावा लागेल. या 28 दिवसांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 जीबी 4G डेटा आणि जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळणार आहे.