रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ एअरफायबरची घोषणा केली. जिओ 5G टेक्नॉलॉजीवर आधारित हायस्पीड इंटरनेट सर्व्हिस जिओ एअरफायबर येत्या 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीला देशभरात लॉंच होणार आहे. या डिव्हाईसमध्ये अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
जिओ एअरफायबरमधून ग्राहकांना 1Gbps स्पीडने डेटा उपलब्ध होईल, असा दावा कंपनीने केला आहे. जिओ एअरफायबरसाठी वेगवेगळ्या स्पीडचे प्लान्स कंपनीने उपलब्ध केले आहेत. यात जिओ एअरफायबर 5G हॉटस्पॉट डिव्हाईस खरेदी करावे लागणार आहे.
'जिओ एअरफायबर'मध्ये हायस्पीड डेटा उपलब्ध होईल. या स्ट्रीमिंग व्हिडिओ, गेमिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारखी खास वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय पॅरेंटल कंट्रोल्स, वाय-फायद्वारे 6 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.
जिओ एअरफायबरची किंमत
ईटी टेलिकॉम या वेबसाईटनुसार जिओ एअरफायबरची किंमत सरासरी 6000 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. 'जिओ एअरफायबर' अॅपने इन्स्टॉल करता येईल. त्याशिवाय जिओ एअरफायबर हे जिओ सेट टॉप बॉक्सशी संलग्न केले आहे. ज्यामुळे ग्राहकाला जिओ एअरफायबरने टेलिव्हीजनवर उच्च दर्जाचा व्हिडिओ स्ट्रीमिंगचा अनुभव घेता येईल.
जिओ एअरफायबरचे प्लान्स
जिओ एअरफायबरचे जिओ फायबरप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स उपलब्ध आहेत. डेटा स्पीडनुसार मासिक प्लान्स आहेत. पोस्टपेड प्लान्समध्ये अनलिमिटेड डेटा 30 Mbps स्पीडने दरमहा 599 रुपये, 100 Mbps स्पीडने अनलिमिटेड डेटा 899 रुपये, 150 Mbps स्पीडने अनलिमिटेड डेटासाठी 999 रुपयांचा मासिक प्लान आहे. 1499 रुपयांना 300 Mbps अनलिमिटेड डेटा, 2499 रुपयांना 500 Mbps अनलिमिटेड डेटा, 3999 रुपयांना 1Gbps आणि 8499 रुपयांना 6600 जीबी ते 1Gbps डेटाचा पॅक उपलब्ध आहे. प्रीपेड प्लान्समध्ये 30 Mbps स्पीडसाठी दरमहा 999 रुपये, 100 Mbps स्पीडसाठी 899 रुपये, 150 Mbps स्पीडसाठी 699 रुपयांचा मासिक प्लान आहे. 399 रुपयांना 30 Mbps, 1499 रुपयांना 300 Mbps, 2499 रुपये 500 Mbps अनलिमिटेड , 3999 रुपयांना 1Gbps आणि 8499 रुपयांना 6600 जीबी ते 1Gbps डेटाचा पॅक उपलब्ध आहे.