मार्केटमध्ये बरेच 5G फोन गेल्या काही महिन्यात लाॅंच करण्यात आले आहेत. पण, 10 हजारांच्या आत 5G मिळणे कठीण आहे. मात्र, itel ने ही जादू केली आहे. तसेच, itel चा P55 Power 5G सर्वात स्वस्त असल्याचा कंपनीने दावा केला आहे. कंपनीने मंगळवारी 26 सप्टेंबरला दोन फोन लाॅंच केले आहेत. यामध्ये itel S23+ आणि P55 Power 5G चा समावेश आहे. चला तर या फोनविषयी जाणून घेऊया.
Table of contents [Show]
स्वस्तात खरेदी करा 5G
कंपनीचा P55 Power 5G तुम्हाला दोन स्टोअरेजच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, यात 4GB+64GB आणि 6GB+128GB चा समावेश आहे. तु्म्हाला ऑफलाईन स्टोअर्समध्ये P55 Power 5G घ्यायचा असल्यास, 4GB+64GB या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
तसेच, याची किंमत फक्त 9,699 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच, 6GB+128GB घ्यायचा असल्यास, तुम्हाला हा फोन 4 ऑक्टोबरपासून अॅमेझॉनवर 9,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय कलरचा पर्याय पाहायला गेल्यास यामध्ये तुम्हाला गॅलेक्सी ब्लू आणि मिंट ग्रीन उपलब्ध आहेत.
फिचर्स आहेत जबरदस्त
फिचर्सविषयी पाहायला गेल्यास या फोनमध्ये तुम्हाला 6.6 इंचाचा HD+ IPS डिस्प्ले मिळणार आहे. यासह 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलींग रेट आहे. तसेच, या फोनला Mediatek Dimensity 6080 चिपसेट देण्यात आली आहे. याचबरोबर मेन कॅमरा 50MP+AI आहे.
याशिवाय सेल्फी कॅमेरा 8MP चा दिला आहे. फोन Android 13 ला सपोर्ट करतो. महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटरी 5,000mAh असून 18W वेगाने फोन चार्ज करायला मदत करणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी बजेटमध्ये तुम्हाला चांगले फिचर्स वापरायला मिळणार आहेत.
itel S23+ या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
itel S23+ च्या किमतीविषयी पाहायला गेल्यास तो तुम्हाला 13,999 रुपयात पडणार आहे, तो 8GB+256GB च्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. हा फोन ऑनलाईन खरेदीसाठी अॅमेझाॅनवर 6 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. हा फोन तुम्हाला लेक सायन आणि एलिमेंट ब्लूमध्ये उपलब्ध आहे.
सेल्फी कॅमेरा आहे भन्नाट
या फोनला 6.78-इंच FHD+ AMOLED स्क्रीन दिली आहे. याचबरोबर फोनला स्टॅंडर्स 60Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलींग रेट आहे. तसेच, या फोनला Unisoc Tiger T616 ची चिपसेट देण्यात आली आहे. फोनचा मेन कॅमेरा 50MP+AI आहे. याशिवाय सेल्फी कॅमेरा 32MP चा दिला आहे.
या फोनमध्ये तुम्हाला 8GB आणि 256GB चा स्टोअरेज मिळणार आहे. हा फोन देखील Android 13 ला सपोर्ट करतो. या फोनला 5,000mAh बॅटरी दिली असून ती 18W वेगाने चार्जिंग करते. या शिवाय हा फोन तुम्हाला 4G मध्ये मिळणार आहे.
फिचर्सनुसार पाहायला गेल्यास एकदम कमी बजेटमध्ये एवढे चांगले फोन मिळणं मुश्कील आहे. त्यामुळे तुम्ही 5G घ्यायचा प्लॅन करत असल्यास P55 Power 5G फोन तुमच्यासाठी बेस्ट ठरु शकतो.