Table of contents [Show]
एटीएम पिन (ATM Pin)
एटीएममधून पैसे काढताना एटीएम पिनचा वापर काळजीपूर्वक करा. एटीएममध्ये पैसे काढताना, तुमच्याव्यतिरिक्त तेथे कोणी उपस्थित नसावे. कोणी त्या ठिकाणी असल्यास त्यांना त्वरित बाहेर जाण्यास सांगा. जर तिथे कोणावर संशय आल्यास, ताबडतोब एटीएममधून बाहेर पडावे.
एटीएम पिन आणि कार्ड कोणालाही देऊ नका (Do not Give ATM PIN and Card to Anyone)
घाईघाईत पैसे काढण्यासाठी अनेक वेळा आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना एटीएम कार्ड आणि पिन नंबर देतो. मात्र ही चूक करू नका. कारण आजकाल जवळच्याच नातेवाईकांनी फसवणूक केल्याच्या घटना मोठया प्रमाणावर होत आहे. त्यामुळे याबाबत ही काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला काही कारणास्तव एटीएम पिन आणि कार्ड कुणाला द्यावे लागले तर ताबडतोब कार्डचा पिन नंबर बदला आणि बँक स्टेटमेंट पहा.
एटीएम सुरक्षा तपासा (Check ATM Security)
एटीएममधून पैसे काढताना घाई करू नका. सर्वप्रथम, एटीएमच्या आतील बाजूस एक नजर टाका आणि कोणताही छुपा कॅमेरा बसवला आहे की नाही हे तपासून पहा. एटीएम कार्ड स्लॉट देखील तपासून घ्या. कारण फसवणूक करणाऱ्या व्यक्ती अनेकदा कार्ड टाकण्याच्या ठिकाणी स्कीमर लावतात. ज्यामुळे तुमच्या कार्डची सर्व माहिती इतर लोकांच्या हातात जाते. जर कार्ड मशीनमध्ये जात नसेल, तर समजून घ्या की. या मशीनमध्ये नक्कीच स्कीमर लावला आहे. त्यामुळे सरळ बाहेर पडा व थेट दुसऱ्या एटीएम जावा.
'ट्रान्झॅक्शन स्लिप' (Transaction Slip)
पिन टाकताना तुमचा दुसरा हात कीबोर्डवर ठेवण्यास कधीच विसरू नका. तसेर बाहेर येण्यापूर्वी 'रद्द करा' हे बटण दाबायला विसरू नका. तुमच्या खात्याबद्दल काही महत्त्वाची माहिती असलेली 'ट्रान्झॅक्शन स्लिप' कधीच तिथे सोडून देवू नका.