अचानक निर्माण झालेल्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज (Short Term Loan) काढतात. यामुळे अल्प-मुदतीच्या कर्जाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. उत्पन्न व खर्च यांचा मेळ नसल्यामुळे या कर्जाची गरज भासते. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले. यामुळे आर्थिक अडचणीचा सामाना करावा लागला आहे. म्हणूनच अल्प मुदतीच्या कर्जाची मागणी वाढली आहे.
बँक व नॉन बँकिंग वित्तीय संस्थांनी कर्ज घेण्याची प्रोसेस सुरळीत व्हावी, यासाठी अनेक सुधारित धोरणे तयार केली आहेत. मार्च 2022 पर्यंत, देशातील कर्ज बाजाराचे एकूण मूल्य 174.3 लाख कोटी रुपये इतके होते, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11.1% जास्त होते. मार्च 2022 पर्यंत व्यावसायिक 49.5%, किरकोळ 48.9% आणि मायक्रो फायनान्स 1.6% कर्ज वाटण्यात आले होते.
अल्प मुदतीचे कर्ज
हे कर्ज कर्जदारांच्या तत्कालिन गरजांवर अवलंबून असते. हे कर्ज मंजूर होण्यासाठी इतर कर्जाच्या तुलनेने कमी वेळ लागतो. यासाठी कर्जदारला मोजकीच कागदपत्र लागतात. वैयक्तिक कर्ज बाजार आर्थिक वर्ष 2019 मध्ये 75088 कोटी रूपयांवरून आर्थिक वर्ष 2022 मध्ये चार पटीने म्हणजेच 147236 कोटींपर्यंत वाढला. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 158.1 लाख खात्यांना कर्ज वितरित करण्यात आले होते. यात वैयक्तिक कर्जाचा संख्या देखील कमी झाली आहे FY17 मध्ये 2.4 लाख वरून FY21 मध्ये 1.5 लाख रूपयांंपर्यंत 40 टक्क्यांनी कमी झाली आहे.
अल्प मुदतीच्या कर्जाचे प्रकार (Types of short term loans)
- ट्रेड क्रेडिट: हे कर्ज व्याजमुक्त असते. यात कर्जदार कोणताही अतिरिक्त खर्च न करता ट्रेड क्रेडीट मिळवू शकतात. याचा वापर करून आपण पेमेंट करू शकतो.
- ब्रिज लोन: कर्जाचे मूल्य मोठे असल्यास मंजूरी मिळण्यास वेळ लागतो. याआधी घेतलेल्या कर्जाला ब्रिज लोन असे म्हणतात.
- मागणी कर्ज: तातडीची आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मागणी कर्ज फरदेशीर ठरते आणि अशा त्वरित कर्जाचा लाभ घेण्यासाठी विमा पॉलिसी आणि इतर आर्थिक साधने तारण म्हणून ठेवले जातात. यातून कर्जाचे मूल्य ठरते.
- वैयक्तिक कर्ज: वैयक्तिक कर्ज हा कर्जाच्या सर्वात लोकप्रिय प्रकरांपैकी एक आहे. कर्जदार घराचे नूतनीकरण, लग्न, उच्च शिक्षण, प्रवासाचा खर्च, वैद्यकीय अडचणी
 इत्यादी मूलभूत खर्च पूर्ण करण्यासाठी या पैशांचा वापर करतो वैयक्तिक कर्जाचे सामान्यतः उत्पन्नावर धारित असते, रोजगार, क्रेडिट इतिहास याची पडताळणी करून हे कर्ज देण्यात येते.
www.mintgenie.livemint.com
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            