iQOO Z7 Pro हा 5G स्मार्टफोन असून तो 31 ऑगस्टला भारतात लॉन्च होणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच Vivo Mobile कंपनीचा सब-ब्रॅण्ड असलेल्या iQOO फोनच्या Z सिरीजमधील स्मार्टफोनचे फीचर्स सोशल मिडियावर लिक झाले आहेत. किमतीच्या रेंजनुसार हा स्वस्तात मस्त फीचर देणारा स्मार्टफोन आहे.
iQOO Z7 Pro या मोबाईलची भारतातील किंमत 25 हजारांपेक्षा कमी आहे. या फोनची तुलना OnePlus या फेमस कंपनीच्या Nord CE 3 मॉडेलशी तुलना केली जात आहे. या मॉडेलची भारतातील किंमत 26,999 रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे iQOO Z7 Pro ची थेट वनप्लसच्या या मॉडेलशी कॉम्पिटीशन असणार आहे.
डिस्प्ले आणि डिझाईन
iQOO Z7 Pro मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि ऑरा लाईटच्या फीचरसोबत 64 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. नुकतेच विवोने लॉन्च केलेल्या Vivo V29 या मॉडेलवर ऑरा लाइटिंग वापरल्याचे दिसून आले होते. त्याचप्रमाणे iQOO Z7 Pro वर ऑरा लाईटचा वापर केला जाणार असल्याचे कळते. याला कर्व्ह डिस्प्ले दिला असून त्यानुसार याचे डिझायनिंग करण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, या सेगमेंटमधील हे सर्वांत स्लिम आणि कमी वजन असलेले मॉडेल आहे.
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 3 गोष्टींवर विशेष भर दिल्याचे दिसून येते. त्यामध्ये मोबाईलचा परफॉर्मन्स, डिझाईन आणि कॅमेरा हे जबरदस्त असल्याचे सांगितले जाते. फोनच्या मागच्या बाजुला दोन लेन्स दिल्या आहेत. तसेच यामध्ये मिडियाटेक प्रोससरचा वापर करण्यात आला आहे.
यामध्ये 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आला असून यासाठी कंपनी अंदाजे 25 ते 30 हजार यादरम्यान किंमत निश्चित करण्याची शक्यता आहे. फोनची बॅटरी क्षमता 4600mAh आहे.