आयफोन-15 या लेटेस्ट आयफोन लॉंचिंगचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या 12 किंवा 13 सप्टेंबर 2023 रोजी आयफोन 15 लॉंच होण्याची शक्यता आहे. त्यातच आता आयफोन 15 सिरिजमधील आयफोन 15 अल्ट्रा या स्मार्टफोनमधील फिचर्स लिक झाली आहेत.
आयफोन 15 सिरिजमधील आयफोन 15 अल्ट्रा हे टॉप मॉडेल आहे. या स्मार्टफोनमध्ये 5x किंवा 6x झूमची क्षमता असणाऱ्या लेन्स असण्याची शक्यता आहे. मात्र आता यात आणखी एक अपडेट आली आहे. आयफोन 15 अल्ट्रामध्ये 10x क्षमतेची पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असू शकते, असे बोलले जाते.
याशिवाय आयफोन 15 अल्ट्रामध्ये याआधीच्या मॉडेलपेक्षा मोठा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. आयफोन 15 अल्ट्रामध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. आयफोन 14 प्रो मॅक्सप्रमाणे यात डिस्प्ले आणि बॅटरी बॅकअप दिला जाऊ शकतो.
आयफोन 15 अल्ट्रा हा 13 सप्टेंबर 2023 रोजी लॉंच होण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत 1 लाख 49 हजारांचा आसपास असू शकते, असा अंदाज टेक्नॉलॉजी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. आयफोन 15 अल्ट्रा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह उपलब्ध होऊ शकतो. यात 48 मेगापिक्से रेअर कॅमेरा आणि 12 मेगा पिक्सेल 2 कॅमेर तसेच 12 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
मेड इन इंडिया असेल आयफोन-15
- अॅपलचे आयफोन निर्मिती करणाऱ्या फॉक्सकॉन कंपनीकडून भारतात आयफोन-15 चे उत्पादन घेतले जाण्याची शक्यता आहे.
- फॉक्सकॉन ही अॅपलची आयफोन तयार करणाऱ्या भागिदारांपैकी एक आहे.
- फॉक्सकॉनच्या तामिळनाडूमधील श्रीपेरुबुंदूरमधील फॅक्ट्रीमध्ये आयफोन-15 चे उत्पादन सुरु करण्यात आल्याचे बोलले जाते.
- पुढील महिन्यात 12 किंवा 13 सप्टेंबरला आयफोन -15 अॅपलकडून लॉंच करण्यात येईल.
- त्यासाठी फॉक्सकॉनकडून आयफोन-15 ची निर्यात केली जात आहे.
- लॉंचिंगनंतर काही आठवड्यातच भारतीय बाजारात ‘मेड इन इंडिया’ आयफोन-15 उपलब्ध होणार आहे.
- याच कारखान्यात आयफोन-14 चे उत्पादन घेण्यात आले होते.
- अॅपलने चीनमधील आयफोन उत्पादन क्षमता कमी केली आहे.
- टप्याटप्याने कंपनीने भारतात आयफोन उत्पादन वाढवण्याला प्राधान्य दिले आहे.
- अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी भारतात गुंतवणूक वाढवण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते.