Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 15 Series: आयफोन चाहत्यांची प्रतीक्षा संपणार! iPhone 15 लॉंचसाठी Apple ची जय्यत तयारी

iPhone 15

iPhone 15 Series: अ‍ॅपलचा iPhone 15 हा लेटेस्ट आयफोन 12 किंवा 13 सप्टेंबर 2023 रोजी लॉंच होईल, अशी चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. 15 सप्टेंबर 2023 पासून आयफोन 15 ची प्री ऑर्डर सुरु होतील, असे यात म्हटले आहे.

आयफोन चाहत्यांसाठी आयफोनच्या नव्या सिरीजबाबत (iPhone 15 Series) एक आनंदाची बातमी आहे. अ‍ॅपलकडून आयफोन 15 सिरिजच्या ग्रॅंड लॉंचिंगची जय्यत तयारी सुरु आहे. सप्टेंबर महिन्यात आयफोन 15 लॉंच होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

आयफोनच्या आतापर्यंतच्या सर्व सिरिजला ग्राहकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. जेव्हा जेव्हा अ‍ॅपलने नवीन आयफोन आणला तेव्हा त्यातील अत्याधुनिक टेक फिचर्सनी ग्राहकांना प्रभावित केले. आताही आयफोन 15 ची जगभरातील चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

अ‍ॅपलचा iPhone 15 हा लेटेस्ट आयफोन 12 किंवा 13 सप्टेंबर 2023 रोजी लॉंच होईल, अशी चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. 15 सप्टेंबर 2023 पासून आयफोन 15 ची प्री ऑर्डर सुरु होतील, असे यात म्हटले आहे. या चर्चा खऱ्या ठरल्या तर 22 सप्टेंबर 2023 पासून iPhone 15 Series बाजारात प्रत्यक्ष विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे मत ब्लुमबर्गचे मार्क गुरमन यांनी व्यक्त केले.

अ‍ॅपलकडून आणि त्यांच्या पार्टनर्स कंपन्यांनी या मेगा इव्हेंटसाठी जय्यत तयारी केली आहे. अ‍ॅपलच्या पार्टनर्स कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेण्यास प्रतिबंध केला आहे.

आयफोन 15 आणि आयफोन 15 प्रो या दोन्ही मोबाईल्समध्ये CMOS इमेज सेन्सर असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या लेटेस्ट आयफोनमध्ये अधिक चांगला कॅमेरा दिला जाईल. ज्यातून युझर्सला उच्च दर्जाचा फोटोग्राफीचा अनुभव मिळेल, असे बोलले जाते.

आयफोन 15मध्ये सध्या 12 मेगापिक्सेल ऐवजी 48 मेगापिक्सेलचा सोनी IMX803 कॅमेरा असण्याची शक्यता आहे. आयफोन 15 ची किंमत किती असेल याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

एका रिपोर्टनुसार आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस यांची किंमत अनुक्रमे 79900 रुपये आणि 89900 रुपये असण्याची शक्यता आहे. काहींच्या मते आयफोन 15 प्लसची किंमत 84990 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.

आयफोन 14 चा सुरुवातीला चाहत्यांनी प्रंचड प्रतिसाद दिला होता.आयफोन 14 चे तब्बल 2 कोटी 60 लाख फोन्स अवघ्या दोन महिन्यात विक्री झाले होते. आयफोन 13 प्रमाणेच ग्राहकांनी आयफोन 14 ला डोक्यावर घेतले होते.