Online Fraud: सध्या ऑनलाईन मालाची विक्री करणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची आर्थिक फसवणूक करण्याची जणू काही नवीन धंदाच सुरू झाला आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोकांच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल होत आहेत. वेगवेगळ्या ऑनलाईन अॅप्सद्वारे ग्राहकांची फसवणूक करून त्यांना चुकीच्या वस्तू पाठवल्या जात आहेत. नुकतेच एका महिलेने अॅमेझॉनवरून 12 हजार रुपयांचा इलेक्ट्रिक टूथ ब्रश ऑर्डर केला होता. पण त्या ऑर्डरऐवजी सदर महिलेला MDH कंपनीची चाट मसाल्याची 4 पाकिटे पाठवण्यात आली होती.
ट्विटरवर @badassflowerbby या नावाने खाते असलेल्या महिलेने फसवणूक झालेल्या या घटनेची माहिती दिली आहे. पण यामध्ये सदर महिलेच्या आईने त्या वस्तुच्या पेमेंटसाठी कॅश ऑन डिलेव्हरी (Cash on Delivery) हा पर्याय निवडला होता. त्यामुळे तिची आर्थिक फसवणूक होण्यापासून सुटका झाली. सदर वस्तुचे पार्सल जेव्हा त्या महिलेच्या हातात आले. तेव्हा तिला त्या पार्सलच्या वजनावरून शंका आली. त्यामुळे त्या महिलेने ते पार्सल ओपन करून नंतर पैसे देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने पार्सल ओपन केले असता, त्यात एमडीएच मसाल्याची 4 पाकिटे होती. याची माहिती त्या महिलेने स्वत:च्या मुलीला दिली. त्यानंतर मुलीने याबद्दल तक्रार दाखल करत सोशल मिडियावर त्याची पोस्ट टाकली.
अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमधून इतरांना वेगवेगळ्या प्रकारचा बोध मिळतो. जसे की, सदर महिलेने ती वस्तू विकत घेताना कॅश ऑन डिलेव्हरीचा पर्याय निवडला होता. त्यामुळे तिची होणारी आर्थिक फसवणूक टळली. अन्यथा तिने त्या वस्तुचे ऑनलाईन पैसे भरले असते तर तिचे सुमारे 12 हजार रुपयांचे नुकसान झाले असते. पण तिच्या सतर्कतेमुळे आणि कॅश ऑन डिलेव्हरीच्या पर्यायामुळे तिचे नुकसान होण्याापासून बचाव झाला.
ऑनलाईन शॉपिंगचे तोटे
ऑनलाईन खरेदीतून फसवणूक होण्याची मोठी शक्यता असते. ऑनलाईन शॉपिंगमुळे क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच काही वेळेस ग्राहकांना चुकीच्या वस्तू दिल्या जातात. काही शॉपिंग वेबसाईट मध्येच बंद होतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
ऑनलाईन शॉपिंगचे जसे फायदे आहेत; तसेच त्याचे काही प्रमाणात तोटे ही आहेत. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना खरेदीदाराने आपली फसवणूक होणार नाही. याची काळजी घेणं गरजेचं आहे.