Induslnd Bank Share Price: लहान-मोठे उद्योग व्यवसाय, वाहन आणि किरकोळ कर्ज मोठ्या प्रमाणात वाटप केल्याने इंडसंड बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. याचा परिणाम चालू आर्थिक वर्षातील पहिल्या (एप्रिल-जून) तिमाहीच्या निकालात दिसून आला. इंडसंड बँकेचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचून 1443 रुपये झाला. मात्र, आज शेअर थोडा खाली येऊन 1422 अंकांवर ट्रेड करत आहे.
इंडसंड बँकेकडून खासगी कर्ज देण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 22% वाढले आहे. जून तिमाहीत बँकेच्या मालमत्तांची स्थितीही भक्कम राहिली. तसेच कर्ज जोखीम 2.7 टक्क्यांवरुन 1.9%वर आली आहे. बँकेने 2,126 कोटी रुपये नफा कमावला. मागील वर्षीच्या तिमाहीपेक्षा 32 टक्क्यांनी जास्त नफा आहे. मागील आर्थिक वर्षातील एप्रिल-जून तिमाहीत कंपनीने 1600 कोटी रुपये नफा कमावला होता.
देशातील आघाडीच्या ब्रोकरेज कंपन्यांनी इंडसंड बँकेच्या शेअरबाबत सकारात्मक मत दिले आहे. हा शेअर्स आणखी वर जाईल, त्यामुळे गुंतवणूकदारांना या शेअर्सचा विचार करावा, असे प्रमुख ब्रोकरेज संस्थांनी म्हटले आहे. पाहूया या संस्थांचे विश्लेषण
सौजन्य - गुगल
मॉर्गन स्टॅनली
मॉर्गन स्टॅनली या अमेरिकेतील आघाडीच्या ब्रोकरेज संस्थेने इंडसंड बँकेचा शेअर 18,00 रुपयापर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला आहे. बँकेचा नफा सातत्याने वाढत आहे. ठेवींची संख्या वाढत असून कर्ज जोखीम कमी झाली आहे. (Induslnd Bank Share Price) येत्या काळात चक्रवाढ पद्धतीने बँकेची वाढ होईल, असे मॉर्गन स्टॅनलीने म्हटले आहे.
सिटी ब्रोकरेज फर्म
सिटी ब्रोकरेज फर्मने इंडसंड बँकेचा शेअर भविष्यात 1630 रुपयांवर जाईल, असे म्हटले आहे. बँकेची स्थिती भक्कम असल्याचे सिटीने म्हटले आहे. 18-23% कर्ज आणखी कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन बँकेने ठेवले आहे. त्यातून व्यवस्थापनाचा आत्मविश्वास दिसतो, असे सिटी ब्रोकरेजने म्हटले आहे.
ICICI सिक्युरिटीज
ICICI ने सुद्धा शेअर वर जाईल, असे म्हटले आहे. भविष्यात इंडसंड बँकेच्या प्रति शेअरची किंमत 1700 रुपये होईल, असे म्हटले आहे. त्यापूर्वी 1550 रुपये शेअरची किंमत होईल, असे म्हटले होते. मात्र, नंतर त्यात वाढ केली. वाहन आणि इतर प्रकारच्या कर्जात वाढ होत असून त्यामुळे बँकेच्या नफ्यात देखील दरवर्षी वाढ होईल, असे ICICI सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस
इंडसंड बँकेच्या शेअरची किंमत भविष्यात 1600 रुपये होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फर्मने वर्तवला आहे. मायक्रोफायनान्सह इतरही क्षेत्रात बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरीत करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)