Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Poverty: पंधरा वर्षात भारतातील 40 कोटी नागरिकांची गरिबीतून सुटका - संयुक्त राष्ट्र

Poverty

2005 ते 2019 या कालवधीत भारतातील सुमारे 40 कोटी जनता गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर आली, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. भारताने गरीबी कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे संयुक्त राष्ट्राने कौतुक केले. फक्त 15 वर्षांमध्ये भारताने ही कामगिरी केली. जगभरातील 25 देशांना हे शक्य झाले, असे UN ने म्हटले आहे.

India Poverty: मागील पंधरा वर्षात भारताच्या विकासाचा आलेख वरती गेला आहे. अनेक क्षेत्रांमध्ये मूलभूत बदल घडून आले. माहिती तंत्रज्ञान, सेवा, निर्मितीसह सर्वच क्षेत्रात प्रगती झाली. देशाच्या प्रगती म्हणजेच देशातील जनतेची प्रगती. मागील पंधरा वर्षात भारताला गरीबी कमी करण्यात यश आल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

फक्त 15 वर्षात भारताची कामगिरी मोठी 

2005 ते 2019 या कालखंडामध्ये भारतातील सुमारे 40 कोटी जनता गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर आली, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. भारताने गरीबी कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे UN ने कौतुक केले. फक्त 15 वर्षांमध्ये केलेली ही कामगिरी एक मोठं यश असल्याचं संयुक्त राष्ट्राने नमूद केले. 

25 देशांना गरीबी कमी करण्यात यश 

ग्लोबल मल्टिडायमेन्शनल पॉव्हर्टी इंडेक्स (MPI) संयुक्त राष्ट्र आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाद्वारे सादर करण्यात आला. जगभरातील 25 देशांना गरीबी कमी करण्यात यश आल्याचं म्हटले आहे. यामध्ये कंबोडिया, चीन, काँगो, होंडुरास, इंडिया, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया आणि व्हिएतनासह इतर काही देशांचा समावेश आहे. 

चालू वर्षी एप्रिल महिन्यात चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला. 140 कोटींपेक्षाही भारताची लोकसंख्या जास्त आहे. दरम्यान, कोरोना काळात नागरिकांच्या जीवनावर काय परिणाम झाला. त्यामुळे गरिबी किती वाढली, याची आकडेवारी संयुक्त राष्ट्राकडे उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. 

2005-06 साली भारतातील सुमारे 64 कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली (मल्टिडायमेन्शनल पॉव्हर्टी) होती. 2015 मध्ये यात 37 कोटींनी घट झाली. तर 2021 पर्यंत 23 कोटी जनता आणखी बहुआयामी दारिद्र्य रेषेच्या बाहेर आली. सर्वाधिक गरीब राज्ये, मागसलेले गट सुद्धा प्रगती करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.