Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Biofuels Production: जैवइंधन निर्मितीत मोठी झेप; रशिया, ब्राझीलही भारतासोबत काम करण्यास तयार

Biofuels Production

प्रदूषण कमी करण्यासाठी भारताने क्लिन एनर्जीकडे लक्ष वळवले आहे. जैवइंधन म्हणजेच बायोफ्यूएल निर्मितीसाठी भारतासोबत काम करण्यासाठी रशिया आणि ब्राझील यासह अनेक देशांनी तयारी दर्शवली आहे. 2070 पर्यंत भारताला 'नेट झिरो कार्बन' हे लक्ष्य गाठायचे आहे. मका, ऊस, जट्रोफा, मका, पिकांचा टाकाऊ भाग यापासून ऊर्जा निर्मिती करता येते.

Biofuels Production: प्रदूषण कमी करण्यासाठी भारताने क्लिन एनर्जीकडे लक्ष वळवले आहे. जैवइंधन म्हणजेच बायोफ्यूएल निर्मितीसाठी भारतासोबत काम करण्यासाठी रशिया आणि ब्राझील यासह अनेक देशांनी तयारी दर्शवली आहे. 2070 पर्यंत भारताला 'नेट झिरो कार्बन' हे लक्ष्य गाठायचे आहे. त्यासाठी भारताने ग्रीन एनर्जीच्या उत्पादनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मका, ऊस, जट्रोफा, मका, पिकांचा टाकाऊ भाग यापासून ऊर्जा निर्मिती करता येते. 

G20 अध्यक्षपदाचा भारताला फायदा? (G20 Group on Biofuel production)

जी-20 देशांच्या गटाचे अध्यक्षपद यावर्षी भारताकडे आहे. या दरम्यान भारत जागतिक स्तरावर जैवइंधन तयार करण्यासाठी इतर देशांसोबत मिळून काम करणार आहे. सध्या भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयात करणारा देश आहे. भविष्यात खनिज तेलावरील आयात कमी करुन जैवइंधन वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहे. कर्नाटकातील बंगळुरु येथे 'ग्रीन एनर्जी विक' साजरा केला जात आहे. यावेळी केंद्रीय खनिज तेल मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली.

जीवाश्म इंधनाची गरज कमी होणार (Fossil fuel need will be reduced)

जैवइंधन निर्मितीक्षेत्रात काम करण्यासाठी भारताबरोबर काम करण्यासाठी अनेक देश तयार आहेत. 2015 साली भारताने इंटरनॅशनल सोलार अलायन्स सुरू केले होते. त्याद्वारे परवडणाऱ्या किंमतीत सोलार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम करण्यात आले, त्याच पद्धतीने आता जैवइंधन अलायन्सची स्थापना करण्यात येणार आहे, असे पुरी म्हणाले. भारत सुमारे 85% क्रूड ऑइलची आयात करतो. हे प्रमाण येत्या काळात कमी करण्यासाठी जैवइंधनावर भर देण्यात येणार आहे. 12 जैव इंधन रिफायनरी सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचेही ते म्हणाले. पिकांची टाकाऊ भाग, शहरांमधून जमा होणारा घनकचरा यापासून बायोइंधन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

जैवइंधनाची वाढ झपाट्याने (Increase in Biofuel use)

भविष्यातील इंधन म्हणून जैव इंधन (Biofuel) लोकप्रिय होत आहे. विकसित देशांनी Biofuel Economy च्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. भारतानेही याच संकल्पनेचा स्वीकार करत देशांतर्गत जैव इंधनाच्या उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण लागू केले आहे. यामुळे जैव इंधन क्षेत्रात संशोधन आणि गुंतवणुकीला चालना मिळाली आहे.

वर्ष 2020 च्या तुलनेत जैव इंधनाची अर्थव्यवस्था वार्षिक 14.1% दराने वाढत आहे. 2021 मध्ये भारताची बायोफ्यूएल इकॉनॉमी 80 अब्ज डॉलर्स इतकी वाढली आहे. जैव इंधनाविषयक बाजारपेठ येत्या 2025 पर्यंत तब्बल 300 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. बायोफ्यूएल एकूण अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे.