महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा मुंबईपासून विदर्भापर्यंत मधल्या टप्प्यातील राज्यातील अनेक भागांना जोडणारा समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे लोकार्पण रविवारी (दि. 11 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर येथे होणार आहे. या 701 किलोमीटर लांबी असलेल्या प्रकल्पासाठी 55 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना शिर्डी ते नागपूर या प्रवासासाठी 900 रुपये टोल भरावा लागणार आहे.
महाराष्ट्राच्या विकासाला एका वेगळ्या वाटेवर नेणाऱ्या आणि अनेक वर्षे विकासापासून लांब राहिलेल्या गावांना समृद्ध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मुंबई ते नागूपर या समृद्धी महामार्गाचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackrey Maharashtra Samruddhi Mahamarg) हे नाव देण्यात येणार आहे.
Table of contents [Show]
समृद्धी महामार्गावरील पहिल्या टप्प्यातील शिर्डी ते नागपूर या प्रवासासाठी वाहनचालकांकडून 900 रुपये आकारला जाणार आहे. शिर्डी ते नागपूर हे अंतर 520 किलोमीटर आहे; हे अंतर समृद्धी महामार्गावरून अवघ्या 5 तासात कापले जाणार आहे.
520 किलोमीटरच्या अंतरासाठी 19 टोल नाके
शिर्डी ते नागपूर हा 520 किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी समृद्धी महामार्गावरून 5 तासांचा अवधी लागेल, असे रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात येत आहे. या 520 किलोमीटरच्या रस्त्याचा खर्च वसूल करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने एकूण 19 ठिकाणी टोल नाके उभारले आहेत.
समृद्धी महामार्गाची उद्दिष्ट्ये
- मुंबईहून नागपूरला 8 तासात पोहचण्याचे उद्दिष्ट्य
- शिर्डी ते नागपूर हे अंतर 5 तासांत पार करता येणार
- मुबंई ते नागपूर 701 किलोमीटर तर शिर्डी ते नागपूर 520 किलोमीटरचे अंतर
- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्य उभारणीसाठी एकूण खर्च 55 हजार कोटी रुपये
- 701 किलोमीटरच्या महामार्गासाठी 65 उड्डाणपूल तर 294 लहान पूल उभारले
समृद्धी महामार्गाचा एकूण 23 हजार 500 लोकांना थेट लाभ
कोकणपासून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा महामार्ग 10 जिल्ह्यातून जाणार असून तो 390 गावांना जोडणार आहे. इंटरकनेक्टीवीटीच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यातील गावांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे.
रस्त्यांच्या इंटरकनेक्टीवीटीमुळे शेतीसह इतर उद्योगांना होणार लाभ
समृद्धी महामार्गालगत असलेल्या जागेवर उद्योगधंदे, शेती आणि शेतीशी संबंधित उद्योगांना चालना दिली जाणार आहे. याचा थेट लाभ शेतकरी आणि उद्योजकांना होणार आहे. महामार्गाला जोडून असलेल्या गावांनाही याचा थेट लाभ होणार आहे. महामार्गालगत हॉटेल आणि इतर व्यवसायालाही चालना मिळणार आहे.