Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Smart Investment : चांगला परतावा मिळण्यासाठी पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण हवा

Share Market Investment

ट्रेडिंग क्षेत्रात पोर्टफोलिओमध्ये वैविध्यता असणे एक महत्वाचा विषय आहे. असे असले तरीही विशेषत: नव गुंतवणूकदारांकडून हा दुर्लक्षित विषय आहे. हंगामी गुंतवणूकदार त्यांचे पोर्टफोलिओ बऱ्यापैकी संतुलित ठेवतात ज्याद्वारे संबंधित जोखीम कमी होते तसेच एकूण परतावा वाढतो. (How Diversified Portfolio help to reduce risk)

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य का हवे?

थोडक्यात सांगायचे झाल्यास, बाजार किंवा विविध क्षेत्र एकसारखीच प्रतिक्रिया देत असतात, असे कधीही होत नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या विशिष्ट भागात वृद्धी होताना दिसत असली किंवा मार्केटमध्ये मोठी वाढ होत असली तरीही काही क्षेत्रांमधील ट्रेंड घसरता असतो. परिस्थिती अगदी उलटही असू शकते. उदाहरणार्थ- सध्याचीच बाजाराची स्थिती पाहू. स्टॉक मार्केटमध्ये गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाली. एक कुशल गुंतवणूकदार या नात्याने मार्केट कोसळत असतानाही कमीत कमी नुकसान झेलण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओत वैविध्यता हवीच. ही लाट भरात असतानाही तुमचे परतावे वाढवून देतील.

गुंतवणूक कशी करावी?

आधी हे पक्के समजून घेऊयात की, पोर्टफोलिओ बांधणी हे काही रॉकेट सायन्स नाही. यासाठी योग्य घटक कोणते आहेत, त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. विविध उद्योग, व्हर्टिकल्स आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क, कंपनीचे व्यवस्थापन (प्रमुख भागधारकांसह), मागणी-पुरवठ्याचे पैलू आदी संबंधित घटकांद्वारे बाजार पूर्णपणे समजून घेणे शक्य आहे. हे एखाद्या घड्याळाप्रमाणे एकमेकांच्या संयोगाने काम करतात. तुम्ही जेवढ्या सूक्ष्मरितीने हे समजून घ्याल, तितके अचूक मूल्यांकन करू शकाल.

वैविध्य कसे आणाल?

तुमचे विविधीकरण हे पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक गुंतवणूक धोरणांवर अवलंबून असते. ही विविधता क्षेत्रांबाबत, मार्केट कॅपिटलायझेशन (लार्ज कॅप/मिड कॅप/ स्मॉल कॅप), किंवा गुंतवणूकीची साधने या सर्वांसंबंधी असू शकते. उत्कृष्ट विविधता असलेल्या पोर्टफोलिओमध्ये सिक्युरिटीज (विविध क्षेत्र आणि कंपनीच्या आकारासंबंधी). कमोडिटीज ( सराफा आणि बेस मेटलसह ) आणि चलन या सर्वांचे वैविध्य असते.  गुंतवणूकदार पर्यायी स्थितीही लक्षा घेतो आणि त्यानुसार आपल्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन साधतो.

ध्येय निश्चित करा व नुकसान थांबवा!

गुंतवणूक करताना संबंधित ध्येय निश्चित करणे आवश्यक असते तसेच भावनिक गोष्टींमध्ये अडकून न पडता स्वतःचे नुकसान टाळणे ही महत्वाचे असते. याद्वारे तुम्ही गुंतवणुकीसह बरेच पुढे जाल. अखेरीस आपल्या गुंतवणुकीचा अनोखा प्लॅन, प्राधान्यक्रम आणि जोखिमीची भूक यानुसार विविधीकरण करणे हा पूर्णपणे तुमचा निर्णय असतो. एकाच क्षेत्रातील किंवा इंन्स्ट्रुमेंटमधील मालमत्ता कधीही संकलित करू नका. यामुळे तुमची जोखीम मोेठ्या प्रमाणावर वाढते. एक गुंतवणूकदार या नात्याने बाजाराची जेवढी अधिक माहिती तुम्ही ठेवाल, तेवढे चांगले शेअर्स किंवा मालमत्ता तुमच्याकडे असेल. कारण, ज्ञान आणि अंतर्दृष्टी हेच बाजाराचे खरे गेम चेंजर्स असतात.