Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Time Deposit Scheme: 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांत मिळेल भक्कम व्याज

Office time deposit accounts

Office time deposit Scheme : तुम्ही जर अशा गुंतवणुकीचा विचार करत असाल, जी पूर्णपणे सुरक्षित आणि चांगला परतावा देईल तर पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम हा एक उत्तम पर्याय आहे. ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल व दरवर्षी व्याज स्वरुपात चांगला परतावा मिळेल. मुदतपूर्तीवेळी तुम्हाला चांगले पैसे मिळतील.

तुम्ही जर अशा गुंतवणुकीचा विचार करत असाल, जी पूर्णपणे सुरक्षित आणि चांगला परतावा देईल तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम हा एक उत्तम पर्याय आहे. ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल व दरवर्षी व्याज स्वरुपात चांगला परतावा मिळेल. मुदतपूर्तीवेळी तुम्हाला चांगले पैसे मिळतील. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट कॅल्क्युलेटरनुसार, या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यास ग्राहकाला 5 वर्षांनी व्याज म्हणून एकूण 43,563 रुपये मिळतील. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

गुंतवणूक कालावधी

पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट ही एखाद्या सामान्य मुदत ठेव (FD) योजनेसारखीच असते. इंडिया पोस्ट वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ते 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5  वर्षांसाठी या योजनेत खाते उघडले जाऊ शकते. खातेधारकांना वार्षिक स्वरूपात एकत्र व्याज मिळते.  

पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट 1 वर्षांच्या मुदत ठेवीवर सध्या 6.8%, 2 वर्षांसाठी 6.9%, 3 वर्षांसाठी 7.0% आणि 5 वर्षांसाठी 7.5% व्याजदर आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केल्यास कलम 80C अंतर्गत आयकरात सवलत देखील मिळेल. आयकर कलम 80C अंतर्गत एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या बचतीचा लाभ या गुंतवणूकीमुळे मिळतो. वार्षिक आधारावर व्याजाची रक्कम अदा केली जाते आणि पैसे थेट पोस्ट ऑफिस खात्यात जमा केले जातील.

5 वर्षात एकूण 41478 रुपये व्याज

पोस्ट ऑफिस एफडीनुसार एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांसाठी टाईम डिपॉझिट खात्यात 1 लाख रुपये जमा केले तर सध्याच्या 7.5% व्याज दराने त्याला पाच वर्षांत एकूण 43,563 रुपये व्याज मिळेल. पाच वर्षांनंतर योजनेत गुंतवणुकीची मुदत संपल्यावर गुंतवणूकदाराला संपूर्ण रक्कम व्याजासह परत मिळेल. भारतीय नागरिकत्व असलेली कुठलीही व्यक्ती पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit) खात्यात गुंतवणूक करू शकतो. यामध्ये, स्वतंत्र व संयुक्त खाते (एकत्र 3 व्यक्ती) अल्पवयीन मुलांच्या वतीने त्याचे पालक किंवा पालनकर्ते हे खाते सुरु करु शकतात. जर अल्पवयीन मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तो या योजनेअंतर्गत स्वतःच्या नावाने खाते देखील उघडू शकतो.

News Source : Zeebiz.com