बॅंकानी त्यांचा MCLR वाढवल्यामुळे ग्राहकांना आता कर्ज काढणे महाग होणार आहे. तसेच, ज्यांनी कर्ज घेतले आहे किंवा घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनाही या वाढलेल्या MCLR चा सामना करावा लागणार आहे. एकीकडे बॅंका एफडी आणि सेव्हिंग्ज खात्यावर चांगले व्याजदर ऑफर करत असताना व्याजदर वाढीमुळे ग्राहकांना कर्जासाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील.
बॅंकेने त्यांच्या व्याजदरावर म्हणजेच वेगवगळ्या मुदतीच्या कर्जावरील MCLR वर 5 बेसिस पाॅईंट्सची वाढ केली आहे. बॅंकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार हे दर 1 सप्टेंबर 2023 पासून लागू आहेत. तसेच, MCLR हा बँकेच्या कर्जाचा किमान दर असतो. त्यामुळे बॅंकेला या दरापेक्षा कमी दराने कर्ज देता येत नाही. याचा परिणाम सर्व कर्जांवर होणार आहे.
आयसीआयसीआय बॅंकेचा नवा व्याजदर
बॅंकेने सर्व मुदतीत MCLR मध्ये 5 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. बॅंकेने वेबसाईटनुसार, ही वाढ केल्यामुळे ओव्हरनाईट MCLR 8.40 टक्क्यांवरुन 8.45 टक्के झाला आहे. तर एक महिन्याचा MCLR 8.45 टक्के झाला. आयसीआयसीआय बँकेतील तीन महिने, सहा महिन्यांचा MCLR अनुक्रमे 8.50 टक्के आणि 8.85 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर एक वर्षाचा MCLR 8.90 टक्क्यांवरून 8.95 टक्क्यांवर पोहचला आहे.
पीएनबी बॅंकेचा नवा व्याजदर
पंजाब नॅशनल बॅंकेने त्यांच्या सर्व मुदतीत MCLR मध्ये 5 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. पीएनबी बॅंकेच्या वेबसाईटनुसार, ही वाढ केल्यामुळे ओव्हरनाईट MCLR 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के झाला आहे. तर एक महिन्याचा MCLR दर 8.20 टक्क्यांवरून 8.25 टक्के झाला आहे. तसेच, तीन महिने, सहा महिन्यांचा MCLR अनुक्रमे 8.35 टक्के आणि 8.55 टक्के झाला आहे. याबरोबर एक वर्षाचा MCLR आता 8.60 टक्क्यांवरून 8.65 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.95 टक्के झाला आहे.