आपल्या कष्टाची कमाई सर्वसामान्य माणूस बँकेत ठेवत असतो. पण मागील काही काळापासून नागरिकांना बँकेतून बोलतोय किंवा बँकेचे खोटे मेसेज पाठवून फसविण्याचा प्रकार वाढत आहेत. पण बँकेच्या नावानं होणाऱ्या फसवणुकीबाबत आता लोकं अधिक सर्तक झालेले आहेत. शॉपिंग ऑफर, फिशिंग लिंक्स, कॅशबॅक रिवॉर्ड्स आणि बनावट ईमेल्सद्वारे पाठवले जातात. या पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. अशा लिंकवर क्लिक केल्यावर तुमची वैयक्तिक माहिती गुन्हेगारांपर्यंत जाते. यानंतर, ऑफरचे आमिष दाखवून ते तुमचे बँक तपशील मिळवतात. त्यानंतर ते तुमच्या खात्यातील सर्व पैसे चोरतात. ज्यात ते स्वत:ला बँकेचे कर्मचारी असल्याचा दावा करतात. तर लॉकडाऊनमध्ये आता हे प्रकरणं अधिकच वाढलेले आहेत.
फसवणुकीपासून बचावासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा
जर बँकेकडून कुठल्याही प्रतिनिधीचा ग्राहकाला फोन आला आणि आपल्याला एटीएम पिन, ओटीपी किंवा पासवर्डबाबत विचारलं, तर त्याला उत्तर देऊ नये. आपण उत्तर दिलं तर आपली खाजगी माहिती ते मिळवू शकतात. एकवेळा पासवर्ड किंवा इतर खाजगी माहिती त्यांना मिळाली तर ते इंटरनेट बँकिगद्वारे आपला पैसा काढू शकतात.
फसवे कॉल करणारे बँकेतून बोलतोय अशा फोनला उत्तर देऊ नये. जर आपण बोलत असाल तर लक्षात ठेवा पासवर्ड, डेबिट कार्ड, पिन, सीवीवी किंवा इतर खाजगी माहिती शेअर करू नका. फसवे कॉल आल्यास आपल्या बँकेला याबाबत माहिती अवश्य कळवावी.
फ्रॉड कॉलवर जर आपण चुकून पासवर्ड सांगितला तर लगेच तो बदलून टाकावा. पासवर्ड, पिन किंवा नंतर TIN सारखी माहिती अतिशय गुप्त असते. इतकंच नव्हे तर बँकेच्या कर्मचाऱ्यांना पण त्याची माहिती नसते. असे जर कॉलवर विचारलं गेलं तर समजा की हा फ्रॉड कॉल आहे. कुणालाही आपल्या ओळखीचं प्रमाण तोपर्यंत सांगू नये, जोपर्यंत आपल्याला कुठलाही ठोस विश्वास मिळत नाही.
फसवे कॉल किंवा मेसेज आल्यानंतर गोष्टींची माहिती देऊ नये.
- क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर
- कार्डचा सीवीवी नंबर जो कार्डच्या मागे 3 किंवा 4 अंकी संख्येचा असतो.
- वन टाईम पासवर्ड (OTP)
- सिक्योर पासवर्ड
- कार्डची एक्सपायरी डेट
- एटीएम पिन-पासवर्ड आणि इतर खाजगी माहिती
- इंटरनेट बँकिंगचा लॉग इन आयडी
असे फोन कॉल येतात तेव्हा थोडी सतर्कता ठेवली तर होणाऱ्या नुकसानापासून आपण स्वतःला वाचवू शकता. आपली कष्टाची कमाई सुरक्षित राहते.