Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Facebook: व्हिडिओ एडिट-अपलोड करायचं टेन्शन सोडा, Facebook घेऊन आलंय जबरदस्त फीचर!

Facebook: व्हिडिओ एडिट-अपलोड करायचं टेन्शन सोडा, Facebook घेऊन आलंय जबरदस्त फीचर!

फेसबुकचे साम्राज्य खूप मोठे आहे, तसेच त्याचा वाढता विस्तार पाहता. युजर्सला(Users) प्रत्येक गोष्ट सहज आणि सोपी व्हावी यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू असतो. आता मेटाच्या (Meta) मालकीच्या फेसबुकने युजर्ससाठी व्हिडिओ फीचर्समध्ये अपग्रेडची घोषणा केली आहे. काय आहे या फीचर्समध्ये सविस्तर जाणून घेवूया.

आजच्या आधुनिक युगात फेसबुक प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. खास करून यंग जनरेशन जी व्यवसायात उतरू पाहत आहे. त्यांच्या बिझनेस प्रमोशनसाठी हा चांगला प्लॅटफाॅर्म म्हणून समोर येत आहे. आतापर्यंत ज्यांना व्हिडिओ बनवण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या आता फेसबुकच्या या व्हिडिओ फीचरमुळे नक्कीच कमी होणार आहेत. कारण, प्रत्येकाला बाहेर पैसे देवून किंवा अन्य ॲपद्वारे एडिटिंग करणं मुश्किल झाले असते. मात्र, कंपनीने या सगळ्यातून मार्ग काढला आहे. कंपनी जुन्या वाॅच टॅबच्या जागी व्हिडिओ टॅब जोडणार आहे. या टॅबच्या मदतीने व्हिडिओ एडिट (Edit) आणि अपलोड (Upload) करणं खूप सहज होणार आहे. यासह, कंपनीने रिफाइन्ड एडिटिंग टूल्स, एचडीआरमध्ये (High Dynamic Range) व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा असे अनेक फीचर्स आणणार असल्याचं सांगितलं आहे.

म्युझिक-इफेक्ट देणं सोप्पं!

नवीन एडिटिंग टूल्सच्या मदतीने, युजर त्यांच्या व्हिडिओंमध्ये म्युझिक, फिल्टर आणि इतर इफेक्ट जोडू शकणार आहेत. तसेच, युझर त्यांचे व्हिडिओ ट्रिम आणि कट करू शकतील, यासह यामध्ये टायटल आणि कॅप्शन जोडण्याची सोय ही असणार आहे. याव्यतिरिक्त, युझर एचडीआरमध्ये (HDR) व्हिडिओ अपलोड करण्यासही सक्षम असतील, जे अधिक स्पष्ट कलर आणि दर्जेदार व्हिडिओ क्वॉलिटी अपलोड करण्यास मदत करेल.

व्हिडिओसाठी वन-स्टॉप शॉप!

नवीन व्हिडिओ टॅब युझर्सला Facebook वर व्हिडिओ शोधणे आणि पाहणे आणखी सोपे करेल. कंपनीने जुन्या वॉच टॅबला या नवीन व्हिडिओ टॅबसह बदलले आहे आणि ते लवकरच शॉर्टकट बारवर दिसेल असे सांगितले आहे. मेटा याला "रील्स, लाॅन्ग व्हीडिओ, लाईव्ह कंटेंट अशा सर्व Facebook वरील सर्व व्हिडिओंसाठी वन-स्टॉप शॉप" असं म्हणत आहे. मेटाच्या मते, "व्हिडिओ" हा पर्याय Android ॲपच्या टाॅपला आणि iOS व्हर्जनच्या बाॅटमला दिसणार आहे.

रील बनवणे, आणखी सहज!

युझर्सला स्वतंत्र रील्स विभागासह व्हिडिओंच्या वैयक्तिक फीडद्वारे ब्राउज करण्याची सुविधा ही दिली जाणार आहे. कंपनीने सांगितले की, युजर्स Facebook फीडमध्ये रील्स एडिट, अपलोड करणे हे सर्व करु शकणार आहेत. म्हणजेच युजर ॲपमधून रील्स अपलोड करत असल्यास, त्यांना थेट त्यामध्ये टेक्स्ट आणि म्युझिक जोडता येणार आहे. याचबरोबर नवीन एडिटिंग पर्यायासह क्लिपचा वेग, बदलणे किंवा मागे घेणे ही क्षमता यामध्ये असणार आहे. मेटा त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर रील आणि व्हिडिओ कंटेंट फॉरमॅट्स वाढवण्यासाठी सतत काम करत आहे. या वर्षी मार्चमध्ये, मेटाने फेसबुकसाठी रील्सची मर्यादा 60 सेकंदांवरून 90 सेकंदांपर्यंत वाढवली.

आपला बिझनेस प्रभावीपणे लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी फेसबुक चांगला प्लॅटफाॅर्म ठरला आहे. त्यात नवीन फीचर ॲड होणे म्हणजे बिझनेसची एक स्टेप प्रगती. फक्त ते तंत्रज्ञान अवगत करून घेणे महत्वाचे.