सध्याचा सुट्ट्यांचा हंगाम सुरु आहे.अनेकजण या हंगामात कुटुंबासह वार्षिक ट्रीपसाठी जातात. कन्फर्म तिकिटांसाठी काही महिनेआधीच रिझर्व्हेशन केले जाते. मात्र पर्यटनाला जाताना ट्रॅव्हल इन्शुरन्स देखील तितकाच महत्वाचा आहे. प्रवासात मौल्यवान वस्तूंची चोरी झाली किंवा सामान हरवले तर त्यावर तुम्हाला विमा कंपनीकडून भरपाई दिली जाते. त्यामुळे ट्रॅव्हल इन्शुरन्स सोबत असेल तर सुटीचा आनंद घेताना कसलेही टेन्शन राहत नाही. मात्र ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा निवडावा याबाबत काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत. (How to Choose Right Travel Insurance)
Table of contents [Show]
इन्शुरन्सचा कालावधी
ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये कालावधी हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही किती दिवस ट्रीपला जात आहात तो संपूर्ण कालावधी इन्शुरन्समध्ये समावेश होणे आवश्यक आहे. जर तुमचा ट्रीपचा कालावधी दोन आठवड्यांचा असेल तर ट्रॅव्हल इन्शुरन्स देखील दोन आठवड्यांचा असावा. केवळ पहिल्याच आठवड्यापुरता विमा पॉलिसी नसावी.
कोणत्या प्रकारची पॉलिसी निवडावी
ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हल इन्शुरन्स उपलब्ध आहेत. ज्यात सिंगल ट्रीप, वार्षिक पॉलिसी अशा प्रकारात उपलब्ध आहे. तुम्ही दर दोन तीन महिन्यांनी नियमित शॉर्ट ब्रेक ट्रीप करत असाल तर तुम्हाला वर्षभराचा ट्रॅ्व्हल इन्शुरन्स फायदेशीर ठरु शकतो.
इन्शुरन्समध्ये कोणत्या गोष्टींवर कव्हरेज आहे हे तपासा
ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये कोणत्या गोष्टींसाठी भरपाई दिली जाते याची आधी खात्री करा. जसे की ट्रीप कॅन्सल झाल्यास मिळणारी भरपाई, वैद्यकीय खर्च आणि आपातकालीन परिस्थिती सुटका करताना होणारा खर्च अशा गोष्टींना कव्हरेज आहे की नाही हे पॉलिसी निवड करण्यापूर्वी खात्री करुन घ्या. तसेच पॉलिसीसोबत अतिरिक्त कव्हरेज दिले जाते का याचाही विचार करा. ज
क्लेमसाठी मर्यादा किती हे चेक करा
बहुतांश ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये क्लेमसाठी मर्यादा निश्चित केलेली आहे.त्यामुळे तुमच्या गरजेनुसार व्यापक भरपाई देणाऱ्या इन्शुरन्सची तुम्ही निवड करु शकता. तसेच क्लेम कोणत्या गोष्टींना दिला जात नाही याचीही माहिती घ्या. जसे की ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, अशा साहसी पर्यटनाचा ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समावेश केला आहे का याची खात्री करायला हवी.
प्रीमियम आणि मूल्यांकन तपासा
तुम्ही ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करणार असाल तर तुम्ही पॉलिसींबरोबर तुलना करु शकता. तसेच कोणत्या पॉलिसीला खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी त्या पॉलिसीबद्दल काय रिव्ह्यू दिला आहे तो एकदा वाचणे आवश्यक आहे. जेणेकरुन ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी तुम्हाल त्या कंपनीबाबत माहिती मिळेल.