PM Awas Yojana केंद्र सरकारच्या माध्यमातून गोरगरीबांसाठी विविध योजना राबवल्या जातात.त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनाही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. पीएम आवास (PMAWAS) या योजनेसाठी अर्ज करताना पुढील काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. अन्यथा अर्जदार लाभापासून वंचित राहू शकतात..अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे त्याची माहिती आपण घेऊयात.
पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण या योजनेतून दुर्गम भागातील घरासाठी लाभार्थींना 1 लाख 30 हजार रुपये दिले जातात. तर, पठारी भागातील घरांसाठी 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते.यासाठी केंद्र आणि राज्य सरकार 60:40 च्या प्रमाणात खर्च करतात. या योजनेसाठी लाभार्थ्याने https://pmaymis.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून अर्ज दाखल करायचा आहे.
पात्रता तपासा-
पंपंतप्रधान आवास योजना ही शहरी आणि ग्रामीण भागासाठी उपलब्ध आहे. मात्र या आवास योजनेचा लाभ भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळत नाही. यासाठी दिलेल्या निकष पूर्ण असणे गरजेच आहे. यासाठी सर्व प्रथम तुम्ही या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण करत आहात का याची पडताळणी करा.
- लाभार्थी हा आर्थिकदृ्या दुर्बल घटकामध्ये मोडणारा असावा
- तुमच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 3 लाख ते 6 लाख रुपयांच्या दरम्यान असावी.(ग्रामीण)
- अर्जदाराचे दारिद्र्यरेषेखालील कुटंबात मोडणारा असावा (BPL)
- अर्जदाराकडे कोणतेही पक्के घर नसावे
- अनुसुचित जाती-जमाती, मजुरी करणारे घटक या योजनेसाठी पात्र ठरतात
शहरी भागासाठी पात्रता-
- आर्थिकदृष्ट्या कमकुवत अर्जदार (EWS) ज्यांच्या कुटुबांचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 पर्यंत असावे
- कमी उत्पन्न गटात मोडणाऱ्यांसाठी (LIG) उत्पन्नाची मर्यादा 3, लाख ते 6,00,000 च्या दरम्यान असावे
- मध्यम उत्पन्न गट-1 (MIG-1) कुटुंबाचे उत्पन्न 6 लाख ते 12 लाख दरम्यान असावे
- अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्यांकडे पक्के घर नसावे.
- कुटुंबात अविवाहित मुलांचा समावेश असावा.
- कुटुंबाने यापूर्वी भारत सरकारने स्थापन केलेल्या कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य आहे. कागदपत्रे नसल्यास तुमचा अर्ज अपात्र ठरू शकतो.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- लाभार्थीचे जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड क्रमांक
- बँक पासबुक
- स्वच्छ भारत मिशन (SBM) नोंदणी प्रमाणपत्र
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
हे नागरिक ठरतात अपात्र-
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ हा प्रत्येकाला मिळत नाही. त्यामध्ये पुढील नागरिक या योजनेसाठी अपात्र ठरतात
- ज्यांचे उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा जास आहे.
- ज्यांच्याकडे स्वत:चे पक्के घर आहे.
- तसेच ज्या कुंटूबात दुचाकी अथवा चारचाकी वाहन आहे.
- याशिवाय, ज्या शेतकऱ्यांकडे 50,000 रुपये मर्यादेचे किसान क्रेडिट कार्ड (KCC) आहे.
- कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा महिन्याला 10,000 पेक्षा जास्त कमावणारे सदस्य असेल तर
- आयकर, व्यावसायिक कर भरणारी व्यक्ती यासाठी अपात्र ठरेल