Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cash Deposit : एकावेळी बँकेत किती रक्कम भरता येते? नियम काय सांगतो, जाणून घ्या…

Cash Deposit

जर तुम्हांला बँक खात्यात 1 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा करायची असेल तर तुम्हांला बँक अधिकाऱ्यांशी बोलावे लागेल. पैशांचा तपशील, त्याचा स्त्रोत, पैसे भरण्याचे कारण आदी गोष्टी बँक अधिकारी तुम्हांला विचारू शकतात. 1 लाखांपेक्षा अधिक पैशांचा व्यवहार जर होत असेल तर प्राप्तीकर विभागाच्या नजरेतून हे सुटत नाही हे लक्षात घ्या.

गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या व्यवहारासंबंधी रिझर्व बँक ऑफ इंडिया वेगवेगळे नियम आणत आहे. सामान्य नागरिकांचा त्रास कमी व्हावा आणि व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी आरबीआय प्रयत्न करत आहे. असाच काहीसा नियम बँक खात्यात एका दिवसांत किती रक्कम जमा केली जावी यासाठी देखील आहे.

एका दिवसांत किती रक्कम जमा करता येईल?

तुमच्या बचत खात्यात रोख रक्कम जमा करणे खरे तर एक सोपी प्रक्रिया आहे. यासाठी तुम्हांला तुमच्याकडील रोख रक्कम बँकेत घेऊन जाणे गरजेचे आहे आणि तेथे जाऊन डिपॉझिट स्लिप भरणे आवश्यक आहे.

डिपॉझिट स्लिपवर ज्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे त्या व्यक्तीचे नाव, खाते क्रमांक, बँक शाखा अडी लिहिणे आवश्यक आहे. परंतु पैसे जमा करत असताना आरबीआयने ठरून दिलेली मर्यादा ओलांडली जाणार नाही याची खात्री करून घ्या. बचत खात्यात एका दिवसासाठी रोख ठेव मर्यादा 1 लाख रुपये इतकी सेट करण्यात आली आहे. देशभरातील सर्व बँकांसाठी ही मर्यादा आखून देण्यात आली आहे.

1 लाखापेक्षा अधिक रक्कम असेल तर?

जर तुम्हांला बँक खात्यात 1 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा करायची असेल तर तुम्हांला बँक अधिकाऱ्यांशी बोलावे लागेल. पैशांचा तपशील, त्याचा स्त्रोत, पैसे भरण्याचे कारण आदी गोष्टी बँक अधिकारी तुम्हांला विचारू शकतात. 1 लाखांपेक्षा अधिक पैशांचा व्यवहार जर होत असेल तर प्राप्तीकर विभागाच्या नजरेतून हे सुटत नाही हे लक्षात घ्या. मोठमोठ्या कंपन्यांसाठी मात्र नियम वेगळे आहेत. ज्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार बँकेतून करत असतात, मोठमोठे व्यवहार करत असतात त्यांच्यासाठी आरबीआयच्या वेगळ्या गाईडलाईन्स आहेत.

अडीच लाखांची मर्यादा…

तुम्ही करत असलेले व्यवहार पारदर्शी असतील, त्यात कुठलेही गैरव्यवहार नसतील तर अशावेळी बँक तुम्हांला अडीच लाखांपर्यंत व्यवहार करण्यास अनुमती देते. खरे तर अशावेळी प्राप्तीकर विभागाची बँक खात्यावर नजर असते. पैसे कुणाच्या खात्यातून कुणाच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात आहे याचे रेकॉर्ड प्राप्तीकर विभाग ठेवत असतो. या व्यवहारात काही गडबड आढळली तर खातेदारावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि जमा केलेल्या रकमेवर 200% दंड देखील आकाराला जाऊ शकतो.

पारदर्शी व्यवहारात अडचण नाही 

काही नागरिकांची बचत ही लाखोंच्या घरात असते. काहींची पूर्वापार संपत्तीची खरेदी विक्रीची रक्कम देखील कोटींच्या घरात असते. योग्य मार्गाने आलेल्या पैशांच्या बाबतीत बँक किंवा आरबीआय कुठलीही कारवाई करत नाही. आह्डी सांगितल्याप्रमाणे पैशाचे स्त्रोत आणि त्याचा वापर कुठे केला जातो आहे हे केवळ बघितले जाते. व्यवहारात काही गडबड वाटल्यास बँक हस्तक्षेप करू शकते.