Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Decline of Kodak: जगातील नंबर वन कॅमेरा कंपनी कशी झाली दिवाळखोर?

kodak company bankruptcy

Image Source : www.camerapedia.fandom.com

'Survival of the fittest' असं चार्ल्स डार्विनने अठराव्या शतकात म्हटलं होते. जो मजबूत, तंदुरुस्त असतो आणि काळानुरुप स्वत:मध्ये बदल करतो तोच स्पर्धेमध्ये टिकतो नाहीतर नाश अटळ, असा ढोबळमानाने याचा अर्थ. तब्बल शंभर वर्ष फोटोग्राफी आणि कॅमेरा निर्मिती क्षेत्रात नंबर वन राहिल्यानंतर रसातळाला गेलेला ब्रँड म्हणजे कोडॅक.

अनेक वर्षांपूर्वी तुम्ही रोलवाला कॅमेरा वापरला किंवा पाहिला असेल तर एक गोष्ट नक्की आठवत असेल. की यातील बहुतेक कॅमेरे (kodak company) कंपनीचे होते. आता बाजारात DLSR, मिररलेस, 3D असे अत्याधुनिक कॅमेरा उपलब्ध आहेत. मात्र, यावर KodaK नाव पाहिलं नसेल. जवळपास एक शतक कॅमेरा आणि फोटोग्राफी क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट असलेली कोडॅक कंपनी अचानक का गायब झाली? (Decline of Kodak)

'Survival of the fittest' असं चार्ल्स डार्विनने अठराव्या शतकात म्हटलं होते. जो मजबूत, तंदुरुस्त असतो आणि काळानुरुप स्वत:मध्ये बदल करतो तोच स्पर्धेमध्ये टिकतो नाहीतर नाश अटळ, असा ढोबळमानाने याचा अर्थ. तब्बल शंभर वर्ष फोटोग्राफी आणि कॅमेरा निर्मिती क्षेत्रात नंबर वन राहिल्यानंतर रसातळाला गेलेला ब्रँड म्हणजे कोडॅक. डार्विनचे वाक्य येथे तंतोतंत लागू होते. कोडॅक कंपनीने काळानुरुप स्वत:मध्ये बदल केले नाहीत तसेच बदल करण्यात उशीर केल्याने त्याचे अस्तित्वच मिटले. 2012 साली कंपनीने दिवाळखोरीसाठी (kodak company bankruptcy) अर्ज केला. पाहूया कोडॅक कंपनीचं नक्की काय चुकलं, ज्यामुळे त्यांचा साम्राज्य बुडालं. 

पहिला कॅमेरा कोडॅकने आणला (First kodak camera)

जार्ज इस्टामॅन यांनी 1889 साली कोडॅक कंपनी स्थापन केली आणि बाजारात पहिला कॅमेरा आणला. त्यावेळी कॅमेरा आणि फोटोग्राफी तंत्रज्ञान बाल्यवस्थेत होते. मात्र, कोडॅक कंपनीने बनवलेला कॅमेरा इतर कंपन्यांपेक्षा चांगला होता. काही दिवसांतच हा कॅमेरा प्रसिद्ध झाला. चित्रपटांची निर्मिती करताना  सिनेमॅटोग्राफी करण्यासाठी आणि कॅमेऱ्यातून फोटो काढण्यासाठी कंपनीने कॉडक्रोम ही रंगसंगती असलेली फिल्म 1935 साली तयार केली. कॅमेऱ्यापेक्षा फोटो काढणाऱ्यासठी लागणारी फिल्म निर्मिती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. ही फिल्म अतिशय प्रसिद्ध झाली. 

कोडॅकच्या स्पर्धक कंपन्या बाजारातून गायब (pushed competitors off the market)          

1962 साली कंपनीने 1 बिलियन डॉलर फिल्म आणि कॅमेरे बाजारात विकले. तर पुढच्या चारच वर्षात 2 बिलियन अमेरिकी डॉलर इतकी विक्री केली. कंपनी जागतिक स्तरावर नावारुपाला आली होती. 1975 सालापर्यंत कंपनीने प्रतिस्पर्धी कंपन्यांना बाजारातून नामशेष केले. अनेक कॅमेरा कंपन्या बंद पडल्या. ग्राहक फक्त कोडॅक कंपनीच्या कॅमेरा आणि इतर उत्पादनांनाच पसंती द्यायचे. 

1980 सालानंतर डिजिटल फोटोग्राफीचा उदय (Invention of digital technology)

कंपनीच्या कॅमेरा आणि फिल्म या उत्पादनांना इतकी पसंती होती की कंपनीचा बाजारातील हिस्सा 90 टक्के होता. मात्र, नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येत होते. आतापर्यंत कंपनी अॅनलॉग तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बनवत होती. मात्र, 1980 नंतर डिजिटल फोटोग्राफी तंत्रज्ञान नव्यानेच उदयास आले होते. त्यामुळे हळुहळू अॅनलॉग कॅमेऱ्यांची विक्री घटू लागली. डिजिटल कॅमेरे बनवणाऱ्या जपानच्या फुजी कंपनीच्या कॅमेऱ्यांना मागणी वाढू लागली. ही जपानी कलर फिल्मी अॅनलॉग फिल्मपेक्षा 20 टक्के स्वस्त होती. 

डिजिटल कॅमेरा क्षेत्रात उडी घेण्याची धडपड (Struggle to enter in digital space) 

कोडॅक कंपनीला उशिरा का होईना जाग आली अन् त्यांनीही डिजिटल कॅमेरा आणि फिल्म निर्मिती सुरू केली. कंपनीने अनेक श्रेणीतील कॅमेरे बाजारात आणले. मात्र, तरीही कंपनीची प्रसिद्धी आणि विक्री दोन्हीही घटू लागल्या. इतर कंपन्यांचा तोपर्यंत कॅमेरा निर्मिती क्षेत्रात जम बसला होता. एकेकाळी फोटो प्रिटिंग आणि फिल्मसाठी लागणारे प्रसिद्ध उत्पादन कॉडक्रोम कंपनीने 2006 साली बंद केले.    

कोडॅक अपयशी होण्यामागील काही महत्त्वाची कारणे - (Reason behind collapse of kodak)

कंपनीला कॅमेरा आणि फोटोग्राफी क्षेत्रातील बदल योग्य वेळी ओळखता आले नाही. कंपनीने डिजिटल कॅमेऱ्याची निर्मिती केली. मात्र, फोटो प्रिंटिंगला जास्त महत्त्व दिले. मात्र, लोकांना फोटो काढायला, ऑनलाइन शेअर करायला आवडते, ही एक मोठी बाजारपेठ असू शकते हे ओळखण्यात कंपनी अपयशी ठरली. व्यवसायाचे नवीन मॉडेल विकसित करण्याची दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. यशाच्या शिखरावर असताना कंपनीने बदलानुसार झटपट नवे निर्णय घेतले नाही आणि आहे त्याच समाधान मानले. डिजिटल युग ओळखण्यात कंपनी अपयशी ठरली. त्यामुळे कंपनीला 2012 साली दिवाळखोरीचा अर्ज भरावा लागला. काळानुरुप व्यवसायात बदल न केल्यास काय होते हे आपल्याला या उदाहरणातून दिसून येते.