Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Pay: मित्रांसोबत झालेला खर्च Google pay वरुन कसा वाटून घेऊ शकता? माहिती करून घ्या!

Google Pay, Digital Payment

Google Pay: Google Pay वापरण्यासाठी, तुम्हाला त्यात तुमचे बँक खाते लिंक (Bank Account Link) करावे लागते, यासारख्या अनेक गोष्टी गुगल पे बद्दल तुम्ही ऐकले असतील, पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे खर्च (expenses). तुम्ही मित्रांसोबत पार्टी केल्या नंतर झालेला खर्च एक जण पे करतो, नंतर ते पैसे परत मिळण्यास किंवा देण्यास त्रास होतो.

Google Pay: गुगल पे हे भारतात ऑनलाइन पेमेंट (Online payment) करण्यासाठी एक विश्वसनीय आणि लोकप्रिय एप्लीकेशन आहे. डिजिटल पेमेंट वापरणाऱ्या जवळपास सर्व भारतीयांनी गुगल पे  चे नाव ऐकले असेल. गुगल पे  हे UPI आधारित डिजिटल पेमेंट एप्लीकेशन आहे जे खास भारतासाठी डिझाइन केलेले आहे. हे ॲप भारतात 18 सप्टेंबर 2017 रोजी Tez म्हणून लॉन्च (launch) करण्यात आले होते, तरीही 28 ऑगस्ट 2018 रोजी गुगल ने Tez चे नाव बदलून गुगल पे  केले. Google Pay वापरण्यासाठी, तुम्हाला त्यात तुमचे बँक खाते लिंक (Bank Account Link) करावे लागते. या सर्व गोष्टी गुगल पे बद्दल तुम्ही ऐकले असतील, पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे खर्च(expenses). तुम्ही मित्रांसोबत पार्टी केल्या नंतर झालेला खर्च एक जण पे करतो, नंतर ते पैसे परत मिळण्यास किंवा देण्यास त्रास होतो. तो त्रास होऊ नये याकरिता गुगल पे वर एक ट्रिक आहे ती जाणून घेऊया 

गुगल पे वर खर्च कसा दिवाईड करू शकतो? (How to split expenses on Google Pay?)

  •  गुगल पे ओपन करा. 
  • सर्च बार वर जाऊन न्यू ग्रुप (New Group) ऑप्शन सिलेक्ट करा 
  • त्या ग्रुप मध्ये तुमच्या मित्रांना ऍड करा 
  • त्या ग्रुपला रीनेम करून ग्रुप तयार करा. 
  • त्यानंतर स्प्लिट अँड एक्सपेन्स (Split and expenses) वर क्लिक करून खर्च झालेली रक्कम टाका. 
  • ती रक्कम गुगल पे तुमच्या ग्रुप मधील मित्रांना दिवाईड करते. 
  • नंतर त्यांना रिक्वेस्ट पाठवून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. 

गुगल पे  वरून पैसे कसे कमवायचे? (How to earn money from Google Pay?)

विविध प्रकारच्या डिजिटल पेमेंट्स व्यतिरिक्त, तुम्ही गुगल पे वर पैसे देखील कमवू शकता.

रेफरमधून पैसे कमवा (Earn money from referrals)

तुम्ही गुगल पे  च्या Refer and Earn प्रोग्राममधून चांगली कमाई करू शकता, गुगल पे  यशस्वी रेफरसाठी 201 रुपये देते. गुगल पे  च्या होमस्क्रीनवर तुम्हाला Referral चा पर्याय मिळेल जिथून तुम्ही Whatsapp, Facebook, Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर गुगल पे ॲप शेअर करू शकता. तुम्ही मेसेजद्वारे डायरेक्ट लोकांनाही आमंत्रित करू शकता. जेव्हा कोणतीही व्यक्ती तुम्ही शेअर केलेल्या लिंकवरून गुगल पे  इंस्टॉल करते आणि पहिला व्यवहार करते तेव्हा तुम्हाला 201 रुपयांचा रेफर बोनस मिळेल आणि त्या व्यक्तीला 21 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

स्क्रॅचने पैसे कमवा (Earn money from scratch)

तुम्ही Google Pay वर स्क्रॅचमधून रु. 1000 पर्यंतचा कॅशबॅक जिंकू शकता. जेव्हा तुम्ही Google Pay वर 50 रुपये किंवा त्याहून अधिक व्यवहार करता तेव्हा तुम्हाला एक स्क्रॅच कार्ड मिळते, ज्यावर तुम्हाला काही बक्षीस मिळते. हे रिवॉर्ड कॅशबॅकसह (Reward Cashback) व्हाउचर देखील असू शकते.