Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Housing Sale: लक्झुरिअस प्रॉपर्टीला ग्राहकांची पसंती! एक कोटीहून अधिक किमतीचे फ्लॅट्स हातोहात विकले

Real Estate

Housing Sale:कोरोनानंतर स्थावर मालमत्ता क्षेत्रात तेजीचे वातावरण दिसून आले आहे. भविष्यात गृह कर्जाचे दर वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी आताच फ्लॅट बुकिंगवर जोर दिला आहे. नाईटफ्रॅंकच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून 2023 या सहा महिन्यात प्रमुख शहारांत एकूण 156640 फ्लॅट्सची विक्री झाली.

रिअल इस्टेटमध्ये सध्या तेजीची बूम आहे. बँकांच्या होम लोन ऑफर्स आणि बिल्डरच्या सवलतींनी ग्राहक खरेदीला प्राधान्य देत आहे. नाईटफ्रॅंक या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार चालू वर्षतील पहिल्या सहामाहीत 1.5 लाख फ्लॅट्सची विक्री झाली आहे. यात  एक कोटींहून अधिक किमतीच्या प्रॉपर्टीचे प्रमाण 30% इतके आहे.

कोरोनानंतर स्थावर मालमत्ता क्षेत्रात तेजीचे वातावरण दिसून आले आहे. भविष्यात गृह कर्जाचे दर वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी आताच फ्लॅट बुकिंगवर जोर दिला आहे. नाईटफ्रॅंकच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून 2023 या सहा महिन्यात प्रमुख शहारांत एकूण 156640 फ्लॅट्सची विक्री झाली. यातील 1 कोटींहून अधिक किंमतीच्या फ्लॅट्सचे प्रमाण 30% इतके आहे.

वार्षिक आधारावर मुंबई, बंगळुरु या शहरांतील फ्लॅट्स विक्रीत अनुक्रमे 8% आणि 2% घसरण झाली. हैद्राबाद शहरातील फ्लॅट विक्रीत यंदा 5% वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. हैद्राबादमध्ये प्रॉपर्टीच्या किंमतीत 10% वाढ झाली आहे.

ग्राहकांकडून वाढत्या गरजांनुसार मोठ्या क्षेत्रफळाचे घराची मागणी आहे. यात वेगवेगळ्या अॅमिनिटीज असलेल्या प्रॉपर्टींना ग्राहकांची पसंती मिळत आहे. 50 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान असलेल्या प्रॉपर्टीजमध्ये यंदा 25% ते 30% वाढ झाली आहे. 50 लाख रुपयांपर्यंतची प्रॉपर्टीचा परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीत समावेश होते.

मुंबई, दिल्ली, नोएडा, बंगळुरु यासारख्या प्रगत शहरांमध्ये रिअल इस्टेटचे दर गगनाला भिडले आहेत. या शहरांत वन बीएचके प्रॉपर्टीची किंमत सरासरी 50 लाख रुपयांच्या आसपास आहे.

पहिल्या सहामाहीत मिड सेगमेंटमधील घरांच्या विक्रीचे प्रमाण 38% इतके होते. तर परवडणाऱ्या घरांच्या किंमतीचे प्रमाण 32% इतके होते. वर्ष 2022 मधील पहिल्या सहामाहीत हे प्रमाण 40% इतके होते. 

मागील सहा महिन्यात नवीन प्रोजेक्ट्समधील फ्लॅट्सची संख्या 173364 इतकी होती. त्यात 8% वाढ झाली. मुंबईचा विचार केला तर आठ प्रमुख शहरांच्या तुलनेत मुंबईत 40798 घरांची विक्री झाली. देशातील एकूण विक्रीच्या तुलनेत हे प्रमाण 26% इतके होते. मुंबईत, बंगळुरु, दिल्ली येथील घरांच्या किंमतीत वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.